पाकिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेची दारे कायमची बंद ? असे आहे ट्रम्प यांचे प्रवेशबंदी धोरण…

Published on -

७ मार्च २०२५ इस्लामाबाद : अमेरिकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षांनी म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातल्या अवैध निर्वासित लोकांना बाहेरचा रास्ता दाखवला.त्यांनतर प्रवेश बंदीचे धोरण आखून कठोर नियम लागू केले आहेत.

या धोरणात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना पूर्णपणे प्रवेशबंदी केली जाईल अशी शक्यता आहे.त्यामुळे पुढच्या काळात पाकिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेची दारे कायमची बंद होतील असा अंदाज लावला जात आहे.

पाकिस्तान वा अफगाणिस्तानच्या तपासणीच्या व छाननीच्या प्रक्रियेत खूप त्रुटी आढळू शकतात.त्यामुळे या दोन्ही देशांच्या नागरिकांना अमेरिकेत संपूर्ण प्रवेशबंदी लागू होऊ शकते.याचा परिणाम म्हणून निर्वासित म्हणून अमेरिकेत आश्रय घेणाऱ्या किंवा शरणार्थी बनून अमेरिकेत वास्तव्य करू इच्छिणाऱ्या असंख्य पाकिस्तानी व अफगाणी नागरिकांना खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी माहिती पाकिस्तान सरकारमधील अस्थापना विभागाने दिली आहे. ट्रम्प प्रशासन स्वतःचे नवे प्रवेशबंदी धोरण आखत आहे.

या धोरणात प्रामुख्याने पाकिस्तानचा समावेश केला गेला आला आहे.तसेच अफगाणच्या नागरिकांना सुद्धा त्यात समाविष्ट केले जाऊ शकते.या प्रवेशबंदी बाबतच्या शिफारस पत्रात दोन्ही देशांचे नाव असून पुढच्या १० दिवसांत अमेरिकेत प्रवेशबंदीचे नवे निर्बंध लागू होतील, असे पाक सरकारमधील एका अधिकाऱ्याने नाव उजागर न करण्याच्या अटीवर सांगितले.

प्रवेशबंदी जाहीर होण्याआधी ज्या पाकिस्तानी नागरिकांकडे वैध अमेरिकन व्हिसा आहे, त्यांनी शक्य तितक्या लवकर अमेरिकेत जावे असे आवाहन या अधिकाऱ्याने केले.तालिबान विरोधातल्या २० वर्षांच्या युद्ध काळात अमेरिकेला विशेष सहकार्य केल्याबद्दल अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी बायडेन यांच्या प्रशासनाने भरपाई म्हणून विशेष स्थलांतर अर्थात पुनर्वसनाची मुभा दिली होती.त्यामुळे अमेरिकेच्या नव्या प्रवेशबंदी धोरणाचा थेट परिणाम अफगाणिस्तानच्या हजारो नागरिकांवर होऊ शकतो.

२ लाख अफगाणी लोकांना पुनर्वसनाची प्रतीक्षा

ऑगस्ट २०२१ मध्ये कुख्यात तालिबानने अफगाणिस्तानची सत्तासूत्रे हाती घेतली.तेव्हापासून अफगाणचे २ लाख नागरिक अमेरिकेत पुनर्वसन होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासितांच्या प्रवेशावर आणि त्यांच्या विमानांना निधी देणाऱ्या परदेशी मदतीवर ९० दिवसांची बंदी घातली आहे. त्यामुळे अमेरिकेचा विशेष स्थलांतरित व्हिसा प्राप्त असलेले किमान २०,००० अफगाण नागरिक पाकिस्थानमध्ये अडकले आहेत त्यांना अफगाणिस्तानातुन तडीपार केले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe