Mumbai Pune Travel : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आत्ताचे सर्वात मोठी अपडेट समोर आली आहेत. तुम्हीही मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करता का? मग आजची बातमी तुमच्याही कामाची राहणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक प्रकल्प संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा बहुचर्चित प्रकल्प येत्या काही महिन्यांनी सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे. एकदा की हा प्रकल्प पूर्ण झाला आणि सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल झाला की मग या दोन्ही शहरादरम्यानच्या प्रवासाचा कालावधी तब्बल अर्ध्या तासांनी कमी होणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार हा बहुप्रतिक्षित प्रकल्प सप्टेंबर 2025 पर्यंत कार्यरत होणार आहे. हा मिसिंग लिंक या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सुमारे 30 मिनिटांनी कमी करेल, असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जातोय. नवीन 13.3 कि.मी. लांबीचा मिसिंग लिंक प्रकल्प सध्याचे 19.8 किलोमीटर लांबीचे अंतर 5.7 किलोमीटरने कमी करणार आहे.
खोपोली एक्झिट आणि सिंहगद इन्स्टिट्यूट दरम्यानचे अंतर 5.7 किलोमीटरने कमी होईल आणि यामुळे प्रवासाचे अंतर आणि प्रवासाचा कालावधी दोन्ही कमी होणार आहेत. यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ तर वाचणारच आहे शिवाय सुरक्षित प्रवास होईल.
एमएसआरडीसी अर्थातच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या प्रकल्पाचे काम करत असून या प्रकल्पासाठी जवळपास 6000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे उद्दीष्ट वापरकर्त्यांना सुलभता प्रदान करणे आणि नियोजित प्रमाणे गर्दीच्या समस्येचे निराकरण करणे असा आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एका सीनियर अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे या प्रकल्पाचे 92 टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे आणि उर्वरित काम हे येत्या काही दिवसांनी पूर्ण होईल आणि सप्टेंबर 2025 पासून हा प्रोजेक्ट सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होईल.
या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास वेगवान होणार आहे. हा प्रकल्प घाट सेक्शनला बायपास करण्यास मदत करणार आहे. किंबहुना हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर ही घाट सेक्शन मधील आधीचा रस्ता तसा सुरू राहणार आहे. घाट सेक्शन मधील रस्त्यांवर अवजड वाहनांना इंट्री दिली जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे या नव्या लिंक रोडवर सर्व प्रकारच्या हलक्या वाहनांना इंट्री राहील आणि यामुळे प्रवाशांचा प्रवास हा अधिक वेगवान होणार आहे. हेच कारण आहे की हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा अशी सर्वसामान्यांची आशा आहे.