लाडकी बहीण योजनेबाबत आताची सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार नाहीत ? CM फडणवीस यांचे विधान चर्चेत

सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दिले जात आहेत मात्र या योजनेअंतर्गत 2100 रुपयांचा लाभ दिला जाईल अशी घोषणा त्यावेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आले होते. दरम्यान आता याच योजनेबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : काल दहा मार्च 2025 रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा होईल अशी आशा महिलांना होती. परंतु प्रत्यक्षात या योजनेबाबत कोणतीच घोषणा झाली नाही. खरंतर सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये वाढ केली जाईल अशी घोषणा केली होती.

सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दिले जात आहेत मात्र या योजनेअंतर्गत 2100 रुपयांचा लाभ दिला जाईल अशी घोषणा त्यावेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आले होते. यामुळे अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबतचा निर्णय होऊ शकतो अशी आशा महिलांना होती.

मात्र अर्थसंकल्पात याबाबत कोणतेच घोषणा झाले नाही यामुळे महिलांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान आता याच योजनेबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी काय म्हटले

काल अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना लाडकी बहिण योजनेबाबत मोठी माहिती दिली. ते म्हणालेत की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशी तरतूद करण्यात आलेली आहे.

महत्त्वाची बाब अशी की यासाठी आवश्यकता भासल्यास पुढे आणखी तरतूद करण्यात येईल. आम्ही महाराष्ट्रातील जनतेला दिलेली आश्वासने 100% पूर्ण करणार आहोत. आर्थिक ताळमेळ साधून 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला जाईल, असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

मंत्री अदिती तटकरे काय म्हणतात?

नुकत्याच काही दिवसांपूर्वी विधानसभेत आदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. आम्ही लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या अर्थसंकल्पात 2100 रुपये देऊ, अशी घोषणा केली नव्हती. खरेतर, जाहिरनामा हा 5 वर्षांसाठी आहे अन त्यामुळे पुढच्या 5 वर्षात कधीही 2100 रुपयांबाबत घोषणा केली जाऊ शकते, असे मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

कशी आहे योजना?

लाडकी बहिण योजनेबाबत बोलायचं झालं तर या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. या योजनेचा लाभ जुलै 2024 पासून दिला जात असून आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यापर्यंतचा लाभ महिलांना देण्यात आला आहे.

आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा लाभ पात्र महिलांना मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे मार्च महिन्याचा पैसा देखील येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

खरंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा पैसा एकाच वेळी खात्यात जमा होईल असे म्हटले जात होते. मात्र हा पैसा टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे. सुरुवातीला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाईल आणि त्यानंतर लगेचच मार्च महिन्याचा हप्ता जमा होईल अशी माहिती समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe