महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार नवीन विमानतळ, उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा, कुठं असणार नवं Airport ?

रस्ते आणि रेल्वे प्रमाणेच विमान वाहतूक सुधारण्यासाठी देखील शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. यासोबतच अनेक एअरलाईन कंपन्यांकडून वेगवेगळ्या शहरातून नवनवीन विमानसेवा सुरू केल्या जात आहेत यामुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळतोय.

Published on -

Maharashtra New Airport : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात रस्ते आणि रेल्वेचे नेटवर्क वाढवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रस्ते आणि रेल्वे प्रमाणेच विमान वाहतूक सुधारण्यासाठी देखील शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सरकार वेगवेगळ्या शहरांमध्ये विमानतळाची उभारणी करत आहे.

यासोबतच अनेक एअरलाईन कंपन्यांकडून वेगवेगळ्या शहरातून नवनवीन विमानसेवा सुरू केल्या जात आहेत यामुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळतोय.

अशातच आता देशाच्या आर्थिक राजधानीतील नागरिकांसाठी म्हणजेच मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईला एका नव्या विमानतळाची भेट मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी ही घोषणा केली आहे.

अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी काल 10 मार्च 2025 रोजी राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला. यावेळी अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी मुंबईला तिसरे विमानतळ मिळणार अशी मोठी घोषणा केली. दरम्यान आता आपण मुंबईतील हे तिसरे विमानतळ नेमके कुठे विकसित होणार याबाबत माहिती पाहणार आहोत.

कुठे तयार होणार मुंबईच तिसर विमानतळ?

अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार म्हणाले की, मुंबईचे नवीन विमानतळ अर्थातच तिसरे विमानतळ हे वाढवन बंदराजवळ प्रस्तावित आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की याच भागात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं स्टेशनही तयार केले जाणार आहे.

खरेतर सध्या मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबईतील एक अशी दोन विमानतळं आहेत. नवी मुंबईतील विमानतळ या वर्षी सुरू होण्याची अपेक्षा आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 85 टक्के काम पूर्ण झाले असून त्याच्या काही चाचण्या देखील पूर्ण झाल्या आहेत. दुसरीकडे आता देशाच्या आर्थिक राजधानीला आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीला तिसरे विमानतळ मिळणार आहे.

तिसऱ्या विमानतळाची घोषणा नुकतीच झाली असून हे विमानतळ वाढवण बंदराजवळ तयार होणार आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात असलेले वाढवन बंदर 2030 पर्यंत कार्यान्वित होईल असेही अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले आहे.

नक्कीच मुंबईला तिसऱ्या विमानतळाची भेट मिळाली तर याचा मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून यामुळे मुंबईतून देशातील कोणत्याही शहरात जाणे आणि विदेशात जाणे सोयीचे होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe