महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार 70 किलोमीटर लांबीचा Ring Road, 9 वर्षांपासून रखडलेला प्रकल्प मार्गी लागणार, कसा असणार रिंग रोड ? वाचा…

वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे भिवंडी शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. खरे तर भिवंडी शहरातील बाह्यवळण रस्ता अर्थात रिंग रोड प्रकल्प हा 2017 मध्ये प्रस्तावित करण्यात आला होता. पण आता या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. आज उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत या प्रकल्पाबाबत मोठी घोषणा केली आहे.

Updated on -

Maharashtra Ring Road Project : एकीकडे पुणे रिंग रोडच्या चर्चा सुरू असतानाच आता महाराष्ट्रातील आणखी एका बड्या शहरात रिंग रोड तयार केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई जवळील भिवंडीला आता रिंग रोडची भेट मिळणार आहे. भिवंडी मधील लोकसंख्या ही गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

सध्या या शहराची लोकसंख्या 17 लाखांच्या वर असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे शहरात वाहनांची संख्या सुद्धा वाढली आहे आणि यामुळे शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडीची समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे भिवंडी शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.

खरे तर भिवंडी शहरातील बाह्यवळण रस्ता अर्थात रिंग रोड प्रकल्प हा 2017 मध्ये प्रस्तावित करण्यात आला होता. पण या प्रकल्पाचे काम तेव्हापासून रखडलेच आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी अडचणी येत असल्याने या प्रकल्पाचे काम ठप्प आहे. पण आता या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे.

आज उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत या प्रकल्पाबाबत मोठी घोषणा केली आहे. उदय सामंत यांनी संबंधित प्रकल्पाचे काम जलदगतीने होण्यासाठी दोन टप्प्यात करण्यात येईल तसेच भूसंपादनाला विरोध मावळण्यासाठी शेतकऱ्यांना स्पर्धात्मक दराने जमीन मोबदला देण्यात येईल अशी घोषणा केली असून यामुळे पुन्हा एकदा हा प्रकल्प चर्चेत आला आहे.

कसा आहे रिंग रोड प्रकल्प ?

भिवंडी शहरात प्रस्तावित करण्यात आलेला रिंग रोड प्रकल्प हा 60 किलोमीटर लांबीचा आहे. हा रिंग रोड शहराजवळील नऊ गावांमधून प्रस्तावित करण्यात आला असून यापैकी तीन गावांमध्ये जमिनीचे भूसंपादन सुद्धा पूर्ण झालेले आहे. परंतु उर्वरित गावांमध्ये या रिंग रोडचा विरोध होत आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या रिंग रोड प्रकल्पासाठी 2017 मध्ये 203 कोटी रुपये मंजूर सुद्धा केलेले आहेत. पण हा प्रकल्प जवळपास नऊ वर्षांपासून रखडलेला असून या प्रकल्पासाठी समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी या प्रकल्पामध्ये जे शेतकरी बाधित होत आहेत त्या शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर जमिनीचा मोबदला द्यायला हवा.

त्यामुळे ज्या गावात भूसंपादनाला विरोध आहे तो दूर होईल अन काम पुढे जाईल. तसेच ज्या 3 गावातील भूसंपादन झाले आहे, त्या टप्प्याचे काम तातडीने सुरू करावे आणि उर्वरित रस्त्याचे काम भूसंपादन झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात स्वतंत्रपणे करावे, त्यामुळे रिंगरोड प्रकल्प वेळेत मार्गी लागेल, अशी मागणी उपस्थित केली. त्यांनी विधानसभेत ही मागणी उपस्थित केली असून यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा मोठी घोषणा केली.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, समृद्धी महामार्ग प्रमाणे भिवंडीतील रिंगरोडच्या भूसंपादनात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात मोबदला देता येणार नाही. मात्र बाजारातील स्पर्धात्मक दराप्रमाणे उर्वरित गावातील भूसंपादनाला मोबदला देण्यात येईल आणि 60 किलोमीटरच्या या रस्त्याचे काम दोन टप्प्यात करण्यात येईल अशी मोठी घोषणा केली.

तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला याबाबतच्या सूचना लवकरात लवकर दिल्या जातील असे सुद्धा सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. नक्कीच भिवंडी शहरातील प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पाचे काम पूर्ण झाले तर शहरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असून शहरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe