Numerology Love : ह्या तारखेला जन्म झालेल्या लोकांचे होते लव्ह मॅरेज ! तुमची जन्मतारीख सांगेल…

Published on -

अंकशास्त्रानुसार, जन्म तारखेला अनन्यसाधारण महत्त्व असते आणि याचा व्यक्तीच्या वैवाहिक जीवनावरही प्रभाव पडतो. विवाह हे दोन प्रकारचे असतात – प्रेम विवाह आणि अरेंज मॅरेज. काही लोक प्रियकर किंवा प्रेयसीसोबत प्रेम विवाह करण्यास प्राधान्य देतात, परंतु काही वेळा परिस्थितीमुळे तसे घडत नाही.

अंकशास्त्रानुसार, मूलांक ३, ५, ६ आणि ९ असणारे लोक प्रेम विवाह करण्याची जास्त शक्यता असते. ते आपल्या जोडीदारावर मनापासून प्रेम करतात आणि कोणत्याही परिस्थितीत प्रेम विवाह करण्यासाठी धडपडतात. यामुळे, त्यांचे वैवाहिक जीवन आनंददायी आणि यशस्वी ठरण्याची शक्यता अधिक असते.

अंकशास्त्राच्या अभ्यासानुसार, चार विशिष्ट मूलांक असणारे लोक लव्ह मॅरेज करण्याची मोठी शक्यता असते. ते मूलांक म्हणजे – ३, ५, ६ आणि ९.

मूलांक ३

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ३ असतो. हे लोक अत्यंत बोलके, मनमिळाऊ आणि सहज लोकांना आकर्षित करणारे असतात. यांना नवीन लोकांशी संवाद साधायला आवडते आणि सहज मैत्री होते. प्रेमात पडल्यावर ते आपल्या जोडीदारावर निस्सीम प्रेम करतात आणि त्यांच्यासोबत लग्न करण्यास तयार असतात.

मूलांक ५

ज्यांचा जन्म ५, १४ आणि २३ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ५ असतो. हे लोक अत्यंत स्वतंत्र विचारसरणीचे आणि रोमँटिक असतात. प्रेम ही त्यांच्या जीवनातील महत्त्वाची गोष्ट असते. एकदा का ते प्रेमात पडले की, त्याला लग्नाच्या बंधनात आणण्यासाठी ते कोणतीही तडजोड करत नाहीत.

मूलांक ६

कोणत्याही महिन्याच्या ६, १५, २४ तारखेला जन्मलेले लोक मूलांक ६ चे असतात. हे लोक आपल्या प्रेमसंबंधात खूप संवेदनशील असतात. एकदा प्रेमात पडल्यावर ते नातं पूर्ण निष्ठेने निभावतात. आपल्या जोडीदारासोबतचे नाते टिकवण्यासाठी ते कोणत्याही अडथळ्यांना सामोरे जाण्यास तयार असतात. हे लोक हमखास प्रेम विवाह करतात.

मूलांक ९

कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो. हे लोक अत्यंत धाडसी आणि जिद्दी असतात. एकदा का त्यांनी कोणावर प्रेम केले, तर ते त्या व्यक्तीसोबतच विवाह करण्यासाठी प्रयत्नशील राहतात. सामाजिक परंपरांपेक्षा त्यांच्यासाठी प्रेम अधिक महत्त्वाचे असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe