Zodiac Sign : सूर्यग्रहाला ग्रहांचा राजा म्हणून ओळखल जात. यामुळे सूर्यग्रहाला वैदिक ज्योतिष शास्त्रात एक अभूतपूर्व असे स्थान देण्यात आले असून सूर्यग्रहांच्या चालीमुळे मानवी जीवनावर मोठा सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यग्रहाचे देखील राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. दरम्यान सध्या मीन राशीमध्ये विराजमान असणारा सूर्य ग्रह अरुण बरोबर 45 डिग्रीवर असणार ज्यामुळे अर्धकेंद्र राजयोग निर्माण होऊ शकतो.

याचा प्रभाव राशीचक्रातील काही महत्त्वाच्या राशींवर पाहायला मिळणार आहे. काही राशीच्या लोकांचे नशीब या काळात पूर्णपणे बदलणार आहे. या लोकांचा संकटाचा काळात समाप्त होणार असून त्यांना चांगले दिवस अनुभवायला मिळणार आहेत.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फारच अनुकूल राहणार आहे. या लोकांना येत्या काही दिवसात चांगला सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहे. या लोकांचे अडकलेले पैसे या काळात परत मिळण्याची शक्यता आहे. हे लोक ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी वरिष्ठ मंडळीकडून या लोकांवर कौतुकांचा वर्षाव केला जाणार आहे.
या काळात समाजात मान सन्मान वाढणार आहे तसेच पद आणि प्रतिष्ठा देखील वाढेल. या काळात वरिष्ठ लोक या लोकांना चांगले सहकार्य करणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून देखील हा काळ फारच अनुकूल ठरेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल तसेच वैवाहिक जीवन देखील सुखकर होणार आहे.
तुळा : कुंभ राशी प्रमाणेच तुळा राशीच्या लोकांसाठी देखील आगामी काळ आनंद देणारा राहणार आहे. या काळात हे लोक इतरांची काळजी घेतील, सेवा करतील आणि यामुळे यांना चांगले समाधान मिळणार आहे. या काळात हे लोक आपल्या कामांमध्ये व्यस्त राहतील.
या लोकांना वरिष्ठांकडून चांगले सहकार्य सुद्धा मिळणार आहेत. या लोकांचा इनकम सोर्स वाढणार आहे. यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली राहील व्यवसायाच्या बाबतीत देखील हा काळ फारच अनुकूल राहणार आहे.
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ विशेष अनुकूल राहणार आहे. या लोकांचा वाईट काळ आता संपणार आहे. या लोकांना सर्वच क्षेत्रात चांगले यश मिळेल. करिअरमध्ये चांगली ग्रोथ होणार आहे कुटुंबासमवेत हे लोक चांगला वेळ घालवतील.
वरिष्ठ या लोकांच्या कामावर विशेष प्रसन्न असतील. हे लोक जर सतर्क राहून कामे करतील तर यांचे उत्पन्न देखील वाढणार आहे. या काळात या लोकांचे आरोग्य उत्तम राहील.