Mahindra Thar Roxx खरेदी करण्यासाठी 2 लाख डाउनपेमेंट केल्यास किती रुपयांचा EMI भरावा लागणार? पहा…

महिंद्रा कंपनीची ही गाडी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय एसयूव्हींपैकी एक आहे आणि बाजारात तिची मोठी मागणी आहे. महिंद्रा कंपनीच्या या लोकप्रिय एसयूव्ही बाबत बोलायचं झालं तर ही कार पेट्रोल आणि डिझेल पॉवरट्रेनच्या पर्यायांसह उपलब्ध होत आहे.

Published on -

Mahindra Thar Roxx : तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. विशेषता ज्यांना महिंद्रा अँड महिंद्रा या लोकप्रिय स्वदेशी कंपनीची महिंद्रा थार रॉक्स खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी विशेष फायद्याची ठरणार आहे.

खरेतर, महिंद्रा कंपनीची ही गाडी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय एसयूव्हींपैकी एक आहे आणि बाजारात तिची मोठी मागणी आहे. नवयुवक तरुणांमध्ये या गाडीची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे.

महिंद्रा कंपनीच्या या लोकप्रिय एसयूव्ही बाबत बोलायचं झालं तर ही कार पेट्रोल आणि डिझेल पॉवरट्रेनच्या पर्यायांसह उपलब्ध होत आहे. दरम्यान जर तुम्ही ही गाडी फायनान्स वर खरेदी करण्याच्या मूडमध्ये असाल तर आज आम्ही तुम्हाला या गाडीची संपूर्ण फायनान्स डिटेल सांगणार आहोत.

महिंद्रा थार रॉक्सची किंमत किती आहे?

महिंद्रा थार रॉक्सची एक्स-शोरूम किंमती बाबत बोलायचं झालं तर या गाडीची एक्स शोरूम किंमत 12.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 23.09 लाख रुपयांपर्यंत जाते. म्हणजे या गाडीच्या बेस मॉडेलची किंमत 12.99 लाख रुपये इतकी आहे आणि याच्या टॉप व्हेरियंट ची किंमत 23.09 लाख इतकी आहे.

या कारच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मॉडेलमध्ये MX5 RWD (पेट्रोल) व्हेरिएंटचा समावेश आहे. नवी दिल्लीमध्ये या व्हेरिएंटची ऑन-रोड किंमत 19.46 लाख रुपये आहे. आता आपण हे व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यास किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार याची एक कॅल्क्युलेशन समजून घेऊयात.

2 लाखाचे डाऊन पेमेंट केले तर किती EMI

महिंद्रा थार रॉक्स खरेदीसाठी ग्राहकांना एकाच वेळी संपूर्ण रक्कम भरण्याची गरज नाही. 2 लाख रुपये डाउनपेमेंट करून ही कार खरेदी करता येऊ शकते. उर्वरित रक्कम बँकेकडून 17.51 लाख रुपयांचे कर्ज घेऊन भागवता येऊ शकते.

बँकेच्या 9% व्याजदरानुसार, चार वर्षांच्या कर्जासाठी दरमहा 43,600 रुपये, पाच वर्षांसाठी 36,400 रुपये, सहा वर्षांसाठी 31,600 रुपये, तर सात वर्षांसाठी 28,200 रुपये ईएमआय भरावा लागेल.

लोन घेण्यापूर्वी ग्राहकांनी सर्व अटी आणि नियम नीट समजून घेणे आवश्यक आहे, कारण वेगवेगळ्या बँकांनुसार कर्जाच्या अटी बदलू शकतात. महिंद्रा थार रॉक्स ही एक ऑफ-रोड एसयूव्ही आहे, जी 2-व्हील ड्राइव्ह पर्यायासह येते.

या कारमध्ये 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 162 hp पॉवर आणि 330 Nm टॉर्क तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये 177 hp पॉवर आणि 380 Nm टॉर्क निर्माण करते.

ही कार मजबूत इंजिनसह आणि आकर्षक डिझाइनमुळे ही कार भारतीय ग्राहकांमध्ये विशेष पसंतीस पडत आहे. तरुण वर्गामध्ये या गाडीची मोठी क्रेझ असून ही गाडी खरेदी करण्यासाठी फायनान्स प्लॅन सुद्धा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe