फक्त 8 एप्रिलपर्यंत ! Brezza वर सध्या मिळतोय भलामोठा डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर

कार खरेदीचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी मारुती Brezza ने जबरदस्त ऑफर आणली आहे.मारुती एप्रिलमध्ये 35,000 पर्यंतची सूट देत असून 8 एप्रिलनंतर किंमत वाढणार आहे, त्यामुळे कार खरेदीची हीच योग्य वेळ आहे.

Updated on -

Maruti Brezza | एप्रिल 2025 मध्ये मारुती सुझुकीकडून त्यांच्या लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट SUV ब्रेझावर मोठी सवलत जाहीर करण्यात आली आहे. कार खरेदीचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी ही एक चांगली संधी आहे. कारण 8 एप्रिलनंतर या कारच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे सध्याची ऑफर ही अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

मारुती ब्रेझावर कंपनीकडून एकूण 35,000 पर्यंतचा लाभ दिला जात आहे. यामध्ये 10,000 पर्यंत रोख सवलत आणि 25,000 पर्यंत स्क्रॅपेज बोनस यांचा समावेश आहे. ही ऑफर प्रामुख्याने Zxi आणि Zxi Plus व्हेरिएंट वर लागू आहे.

मात्र, ब्रेझाच्या एंट्री-लेव्हल व्हेरिएंट्सवर कोणतीही रोख सवलत मिळणार नाही. तरीही काही प्रकारांवर एक्सचेंज फायदे मिळू शकतात. ब्रेझाच्या CNG व्हेरिएंटवर कोणतीही ऑफर नाही. विशेष म्हणजे, कंपनीच्या अर्बानो एडिशन किटवर 17,001 पर्यंत सूट दिली जात आहे, या किटची किंमत 42,001 आहे.

इंजिन आणि मायलेज 

ब्रेझा मध्ये दिलेले इंजिन आणि मायलेजबाबत बोलायचे झाले, तर यात के-सिरीज 1.5-लिटर ड्युअल जेट WT पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 103 bhp पॉवर आणि 137 Nm टॉर्क जनरेट करतं. या कारमध्ये Smart Hybrid तंत्रज्ञान दिले गेले आहे. मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये ही कार 20.15 km/l मायलेज देईल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह ती 19.80 km/l चा मायलेज देईल, असा कंपनीचा दावा आहे.

ही SUV आता अनेक प्रगत वैशिष्ट्यांसह येते. त्यामध्ये 360-डिग्री कॅमेरा, 9-इंचाचा टचस्क्रीन SmartPlay Pro Plus इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट यांचा समावेश आहे. Suzuki आणि Toyota यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

इतर फीचर्स काय ?

त्याचप्रमाणे, ही कार वायरलेस चार्जिंग डॉकसह येते, जी जलद चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षेच्या दृष्टीने ही SUV अधिक प्रगत बनली आहे. Brezza मध्ये स्मार्ट कनेक्टेड फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

Brezza ची एक्स-शोरूम किंमत 8.69 लाख पासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी ती 13.98 लाखांपर्यंत जाते. ही SUV भारतात Tata Nexon, Hyundai Venue आणि Mahindra XUV300 सारख्या गाड्यांशी थेट स्पर्धा करते. जर तुम्हाला फीचर्ससह एक विश्वासार्ह SUV हवी असेल, तर Brezza ही ऑफर तुमच्यासाठी योग्य ठरू शकते, कारण 8 एप्रिलनंतर तिची किंमत वाढणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe