New Vande Bharat Train : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! ‘या’ मार्गावर धावणार नवीन वंदे भारत ट्रेन, रूट कसा राहणार ?

सध्या देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वंदे भारत ट्रेन धावत आहे. ज्या राज्यांमध्ये ही गाडी सुरू नाही त्या ठिकाणी देखील या गाडीचे संचालन आगामी काळात सुरू होणार आहे. जम्मू-काश्मीरला देखील लवकरच ही गाडी मिळण्याची शक्यता आहे. अशातच मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश मधील रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होईल अशी माहिती समोर आली आहे.

Updated on -

New Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे, देशाला आणखी एका नव्या वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. रेल्वे बोर्डाकडून लवकरच एका महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू केली जाणार आहे.

सध्या देशातील जवळपास 65 हुन अधिक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू असून आता आणखी एका नव्या मार्गावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याची बातमी समोर आली असल्याने रेल्वे प्रवाशांना नक्कीच यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

कोणत्या मार्गावर धावणार नवीन वंदे भारत ?

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशला पुन्हा एकदा वंदे भारत एक्सप्रेसची मोठी भेट मिळणार अशी शक्यता आहे. जून 2025 पासून मध्य प्रदेशात आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस रुळावर धावताना दिसणार आहे. ही ट्रेन भोपाळ ते लखनऊ दरम्यान चालणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यामुळे, मध्य प्रदेश ते उत्तर प्रदेश दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दीतून मुक्तता होणार आहे. ही ट्रेन सुरू झाल्यानंतर दोन राज्यांमधील प्रवास वेगवान होणार आहे पण यासाठी प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या भोपाळ ते लखनौपर्यंत सुमारे 15 अप्रत्यक्ष गाड्या धावत आहेत, परंतु ही ट्रेन या दोन्ही रेल्वे स्थानकांना थेट जोडणार आहे. मात्र वंदे भारतचे थांबे कमी असतील.पण या गाडीचा वेग हा 160 किलोमीटर प्रति तास इतका राहणार आहे.

या मार्गावर आठ कोच असणारी वंदे भारत ट्रेन चालवली जाईल अशी सुद्धा माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. आठ कोच असणारी वंदे भारत ट्रेन या मार्गावर सुरू झाली तर ट्रेनमध्ये एकूण 564 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.

सध्या भोपाल ते लखनऊ दरम्यान ज्या गाड्या सुरू आहेत त्या गाड्यांमध्ये नेहमीच वेटिंग लिस्ट असते. म्हणून या मार्गावर ही हायस्पीड ट्रेन सुरू झाली तर प्रवाशांचा प्रवास चांगला वेगवान होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe