महाराष्ट्रातील ‘ह्या’ मोठ्या धरणावर तयार होणार नवा केबल पूल ! नागरिकांना फडणवीस सरकारच मोठं गिफ्ट

धरणावर एक नवीन केबल पूल विकसित होणार असून या पुलामुळे धरणाचा आजूबाजूला असणाऱ्या अनेक गावांमधील नागरिकांचा प्रवास वेगवान होणार आहे. दरम्यान युद्ध पातळीवर सुरू असणाऱ्या याच प्रकल्पाच्या बाबत आता एक नव अपडेट हाती आलं आहे.

Updated on -

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात जलद गतीने सुरू असणाऱ्या या रस्ते विकासाच्या प्रकल्पांमुळे राज्यातील रस्त्यांची कनेक्टिव्हिटी ही आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे. तसेच राज्यात अजूनही अशा अनेक महत्त्वाच्या रस्ते विकासाचा प्रकल्पाचे कामे सुरूच आहेत.

यातीलच एक महत्त्वाचा प्रकल्प सातारा जिल्ह्यात विकसित होतोय. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणावर एक नवीन केबल पूल विकसित होणार असून या पुलामुळे धरणाचा आजूबाजूला असणाऱ्या अनेक गावांमधील नागरिकांचा प्रवास वेगवान होणार आहे.

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणावर

आम्ही आपणास सांगू इच्छितो की सातारा जिल्ह्यातील कोयना धरणावर साकारला जाणारा 540 मीटर लांबीचा अत्याधुनिक केबल पूलचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून काम जलद गतीने पूर्ण व्हावी अनुषंगाने शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान युद्ध पातळीवर सुरू असणाऱ्या याच प्रकल्पाच्या बाबत आता एक नव अपडेट हाती आलं आहे. अशा परिस्थितीत, आज आपण सातारा जिल्ह्यातील कोयना धरणावर तयार होणारा हा केबल पूल प्रकल्प नेमका कसा असेल? या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील कोणकोणत्या गावांना फायदा होणार आणि या प्रकल्पाचा रूट मॅप नेमका कसा असेल याचा संदर्भातील सविस्तर आढावा घेणार आहोत.

कसा असणार प्रकल्प?

मिळालेल्या माहितीनुसार, तापोळा ते अहिर दरम्यान शिवसागर जलाशयावर हा नवीन केबल पूल विकसित केला जाणार आहे. सांगितल्याप्रमाणे, या पुलामुळे दुर्गम कांदाटी खोऱ्यातील दळणवळण सुलभ होणार आहे.हा प्रकल्प जवळपास 175 कोटी रुपयांचा खर्च करून विकसित केला जाणार आहे. 175 कोटींच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या या पुलाचे काम टी अँड टी इन्फ्रा लि.कडे देण्यात आले आहे.

या पुलामुळे या जलाशयाच्या आजूबाजूला असणाऱ्या स्थानिक गावांना मोठा वळसा टाळता येणार असून इंधन, वेळ आणि खर्चात बचत होणार आहे. यामुळे या भागातील विकासात हा केबल पूल महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.महत्त्वाचे म्हणजे या केबल पुलामुळे पुढील टप्प्यात रत्नागिरीशी थेट संपर्क साधता येणार आहे. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर पुलाच्या मध्यभागी 43 मीटर उंच गॅलरी आणि दोन कॅप्सूल लिफ्टची सोय पर्यटनासाठी आकर्षण ठरणार आहे.

म्हणजेच यामुळे दळणवळण व्यवस्था तर सुरळीत होणारच आहे शिवाय पर्यटनाला देखील मोठी चालना मिळणार असून सातारा जिल्ह्याचा एकात्मिक विकास यामुळे सुनिश्चित होईल अशी अशा व्यक्त होत आहे.सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरात उभारला जाणारा हा पूल भविष्यात पर्यटनस्थळ म्हणूनही विकसित केला जाणार आहे, त्यामुळे या भागाच्या सर्वांगीण विकासाला नक्कीच चालना मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News