मोठी बातमी ! ‘या’ मार्गावर लवकरच धावणार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 3 तासात 36 बोगद्यांमधून धावणार हायस्पीड ट्रेन, कसा असणार रूट?

सध्या देशात 65 हुन अधिक महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे. याशिवाय राज्याला वंदे भारत स्लीपर ट्रेनची सुद्धा भेट मिळेल असे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवी दिल्ली ते श्रीनगर दरम्यान नवी वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार असून येत्या तीन दिवसांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाईल.

Published on -

Vande Bharat Train : देशातील वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे आणखी विस्तारले जाणार आहे कारण की देशातील एका महत्त्वाच्या मार्गावर लवकरच वंदे भारत ट्रेनचे संचालन सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे. महत्त्वाची बाब अशी की, येत्या काही दिवसांनी या गाडीचे उद्घाटन होणार असून यामुळे देशातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या आणखी वाढणार आहे.

सध्या देशात 65 हुन अधिक महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात सध्या अकरा वंदे भारत गाड्या धावत आहेत आणि लवकरच राज्याला आणखी काही नवीन गाड्यांची भेट मिळू शकते.

पुणे ते धुळे, मुंबई ते धुळे, पुणे ते शेगाव अन मुंबई ते शेगाव अशा काही महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत गाड्यांचे संचालन सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय राज्याला वंदे भारत स्लीपर ट्रेनची सुद्धा भेट मिळेल असे म्हटले जात आहे.

दुसरीकडे जम्मू-काश्मीरला पहिल्यांदाच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवी दिल्ली ते श्रीनगर दरम्यान नवी वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार असून येत्या तीन दिवसांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाईल.

म्हणजे 19 एप्रिल 2025 रोजी या गाडीचे लोकार्पण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण ही गाडी दिल्लीहून थेट श्रीनगरला धावणार नाहीये. ही गाडी दिल्लीहून कटरा पर्यंत चालवली जाईल आणि यानंतर प्रवाशांना कटरांमध्ये गाडी बदलावी लागणार आहे आणि पुढे श्रीनगर पर्यंत जाता येणार आहे.

या वंदे भारतची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या मार्गावर सुरू होणारी ही हायस्पीड ट्रेन अवघ्या एका तासात 36 बोगद्यांमधून जाणार आहे. जम्मू हुन श्रीनगरला जाताना ही गाडी 36 बोगद्यांमधून धावणार आहे.

खरे तर जम्मू ते श्रीनगर हा नव्याने तयार करण्यात आलेला रेल्वे मार्ग 272 किलोमीटर लांबीचा आहे मात्र यापैकी 119 किलोमीटर लांबीचे अंतर हे बोगद्यांमधील आहे. ही ट्रेन उधमपुर श्रीनगर बारामुला रेल लिंक सह डोंगराळ भागातील बोगद्यांमधून धावणार आहे आणि प्रवाशांना अगदीच रोमांचक प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

ही गाडी आठ कोच वाली राहणार आहे. या मार्गावर धावणारी वंदे भारत ट्रेन जवळपास 18 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरून धावणार आहे. रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही वंदे भारत ट्रेन या मार्गावरील रियासी, बक्कल, दुग्गा, सावलकोटे,

संगलदान, सुंबेर, खारी, बनीहाल, शाहाबाद हिल हॉल्ट, कांजीगुंड, सदुरा, अनंतनाग, बिजबेहरा, पंजगाम, अवंतीपोरा, रत्नीपोरा, काकापोरा, पंपोर या रेल्वे स्थानकावरून धावणार आहे. परंतु या गाडीला या मार्गावरील काही महत्त्वाच्याच रेल्वे स्थानकावर थांबा राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe