Maharashtra Expressway : राज्याला आणखी एका नव्या रस्ते विकासाच्या प्रकल्पाची भेट मिळणार आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच अजूनही अनेक रस्ते विकासाची कामे राज्यात सुरूच आहेत. 701 किमीचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा देखील महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा महामार्ग प्रकल्प असून आत्तापर्यंत या रस्त्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे.
पण अजूनही या रस्त्याचा शेवटचा टप्पा बाकी आहे. या महामार्गाचे आत्तापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे आणि यावर वाहतूक सुद्धा सुरु आहे. खरे तर समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. यानंतर 2023 मध्ये याचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि 2024 मध्ये याचा तिसरा तपास सुरू झाला.

आता या महामार्गाचा शेवटचा म्हणजेच चौथा टप्पा कधी सुरू होणार याबाबत विचारणा होऊ लागली आहे. दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. या महामार्गाचा शेवटचा टप्पा कधीपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुला केला जाईल याबाबत अधिकाऱ्यांकडून मोठी माहिती हाती आली आहे.
केव्हा सुरू होणार शेवटचा टप्पा ?
समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला होता. यानंतर 2023 मध्ये या महामार्गाचा शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला. नंतर 2024 मध्ये या महामार्गाचा भरवीर ते ईगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला आणि अशा पद्धतीने सध्या स्थितीला समृद्धी महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.
तसेच या महामार्गाचा चौथा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते आमने हा शेवटचा टप्पा लवकरच सुरू केला जाणार आहे. या शेवटच्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होणाऱ्या 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे 100% काम पूर्ण झाले आहे. यामुळे लवकरच या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन होणार असल्याचे बोलले जात आहे.
खरंतर समृद्धी महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतले आहे. सदर प्राधिकरणाच्या माध्यमातून या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी आतापर्यंत अनेक तारखा देण्यात आल्या होत्या. मात्र नियोजित वेळेत या महामार्गाचा शेवटचा टप्पा सुरू होऊ शकला नाही. या शेवटच्या टप्प्यासाठी देण्यात आलेली उद्घाटनाची तारीख जवळ आली की ऐनवेळी ही तारीख पुढे ढकलली जाते. अशातच आता या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणाची एक नवीन तारीख हाती आली आहे.
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सुरू होऊ शकतो. म्हणजेच 1 मे 2025 रोजी समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा अर्थातच इगतपुरी ते आमने हा शहात्तर किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्स मध्ये असा दावा केला जात असला तरी देखील प्रत्यक्षात अजून सरकारकडून याबाबतचे कोणते अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
यामुळे हा टप्पा एक मे 2025 रोजी खुला होणार का हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान हा महामार्ग प्रकल्प सुरू झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हा प्रवास फारच वेगवान होणार आहे. संपूर्ण समृद्धी महामार्ग खुला झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या 8 तासात शक्य होणार असल्याचा दावा केला जातोय.