Snake Viral News : दरवर्षी पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात सर्पदंशाने मरण पावणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. एका आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी एका लाखाहून अधिक लोक सर्पदंशामुळे मरतात. खरे तर आपल्या देशात फक्त चार-पाच विषारी सापांच्या जाती आहे. सापांच्या असंख्य जाती असतानाही विषारी जातींची संख्या फारच कमी आहे.
मात्र असे असेल तर दरवर्षी आपल्या देशात हजारो लोकांना जीव द्यावा लागतो. याचे कारण म्हणजे सापांच्या बाबत आपल्याकडे वेगवेगळ्या मान्यता आहेत आणि अनेकांना साप चावल्यानंतर वेळेवर उपचार मिळत नाही. पण भविष्यात आता सर्पदंशामुळे कोणाचाच मृत्यू होणार नाही कारण की संशोधकांनी एक नवीन औषध शोधला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केनियामधील संशोधकांना सर्पदंशावर एक नवीन फॉर्मुला सापडला आहे. सर्पदंशावर आता युनिथिओल नावाचे औषध वापरले जाऊ शकते असा नवा शोध केनियामध्ये लागला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ई-बायोमेडिसिनमध्ये अलीकडेच एक लेख प्रकाशित झाला होता.
ज्यातील एका अहवालात याबाबत दावा करण्यात आला आहे. या जर्नलमध्ये संशोधकांनी युनिथिओल नामक औषध सापाचे विष संपवण्यास मदत करते असा दावा करण्यात आला आहे. यामुळे सध्या या जर्नल मध्ये समाविष्ट झालेल्या या अहवालाची जोरदार चर्चा सुरू आहे.
खरेतर युनिथिओल नावाचे औषध पूर्वी फक्त धातु विषाक्ततेसाठी वापरले जात होते, पण आता हेच औषध सर्पदंशावर वापरले जाण्याची शक्यता असून याबाबतचे संशोधन यशस्वी ठरले असल्याचा दावा एका मेडिकल जर्नल मध्ये करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, केनियामधील एकूण 64 लोकांवर या औषधाचा वापर करण्यात आला. 64 लोकांना साप चावल्यावर युनिथिओल नावाचे औषध दिले गेले आणि महत्त्वाचे बाब म्हणजे हे सर्व लोक या औषधामुळे पूर्णपणे बरे झालेत.
या औषधामुळे सापांच्या विषाचा त्या लोकांवर कोणताच परिणाम झाला नाही. त्यामुळे भविष्यात हे औषध सापाचे विष उतरवण्यासाठी वापरले जाऊ शकते. या औषधाचा वापर सर्पदंशावर केला जाऊ शकतो. महत्त्वाची बाब अशी की हे औषध देताना कोणत्याही तज्ञ लोकांची गरज भासणार नाही, असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की आतापर्यंत जेवढी सर्पदंशावरील औषधे आहेत ते एका विशिष्ट तापमानात स्टोर करावी लागतात. यामुळे काही भागात या औषधांचा पुरवठा होत नाही. पण हे युनिथिओल कोणत्याही तापमानात ठेवले जाऊ शकते.
हे औषध पाण्यासोबत घेता येते म्हणजेच जशी आपण गोळी खातो तसे हे औषध घेता येऊ शकते. आगामी काळात हे औषध कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये सुद्धा उपलब्ध करता येणे शक्य होणार आहे. पण, सध्या जे सर्पदंशावर एंटीव्हेनम औषध दिले जाते ते इंजेक्शनद्वारे घ्यावे लागते.
म्हणजेच युनिथिओलचा वापर सुरु झाला तर याला घरात स्टोर करता येऊ शकत अन कोणीही हे औषध देऊ शकत. नक्कीच या संशोधनाला जर शंभर टक्के यश मिळालं तर हा एक मोठा चमत्कार ठरणार आहे. यामुळे लाखो लोकांचे जीव वाचणार आहेत.