Maharashtra Schools : राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे राज्य शासनाच्या मोफत गणवेश वाटप योजनेबाबत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जाणार असून यासाठी आता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील मोफत गणवेश वाटप योजनेसाठी 248 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती हाती आली असून यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीन गणवेश वाटप होणार असल्याचे बोलले जात आहे.

खरे तर गेल्या वर्षी राज्य शासनाने गणवेश वाटप योजनेत मोठा बदल केला होता. एक राज्य एक गणवेश या संकल्पनेतून मोफत गणवेश वाटप योजनेचे केंद्रीकरण करण्याचा निर्णय झाला. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे गणवेश वाटपात मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला.
शासनाच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना योग्य गणवेश मिळू शकला नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी पदरमोड करून शाळेचा गणवेश अड्जस्ट केला. गेल्या वर्षी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना मापाचे गणवेश मिळाले नाहीत, काही विद्यार्थ्यांना फाटके गणवेश मिळालेत.
यामुळे राज्य शासनाच्या या निर्णयाची त्यावेळी मोठ्या प्रमाणात किरकिरी झाली. विरोधकांनी या निर्णयावरून शासनाला घेरले. विरोधकांनी तसेच पालकांनी आणि शिक्षकांनी सुद्धा एक राज्य एक गणवेश योजनेला तीव्र विरोध दाखवला.
दरम्यान याच विरोधाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून ही योजना रद्द करण्यात आली. म्हणजे नव्या शैक्षणिक वर्षात आता पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीच्या स्तरावर गणवेश वाटपाचे अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भातील सूचना जारी केल्या असल्याचे समजत आहे. दरम्यान मोफत गणवेश वाटप योजनेसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याने यावर्षी वेळेत विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेशचे दोन संच दिले जाणार आहेत. आता आपण शासनाच्या मोफत गणवेश वाटप योजनेचा कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार याची माहिती पाहूयात.
कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मोफत गणवेश चा लाभ राज्यातील पहिली ते आठवी या वर्गातील सर्व मुलींना मिळणार आहे. तसेच, या वर्गातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुले आणि दारिद्र्यरेषेखालील मुलांना याचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये पहिलीच्या वर्गात जे विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत, तसेच शाळेत नव्याने प्रवेश घेणारे गणवेश पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेशांचे वाटप केले जाणार आहे.
एकंदरीत मोफत गणवेश वाटप योजनेसाठी शासनाकडून 248 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याने यावेळी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणवेश पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळू शकणार आहे आणि यामुळे गेल्या वर्षी गणवेश वाटप करताना जो गदारोळ झाला होता तो गदारोळ दिसणार नाही अशी आशा आता व्यक्त होताना दिसत आहे.