Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी शिक्षक म्हणून सेवा बजावत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.
कारण की, राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांसाठी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. भुसे यांनी शिक्षकांना एक नवीन ड्रेस कोड लागू केला जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.

ते नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या अजंग येथील शाळेत आले असता त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. खरेतर, अजंग येथील शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका एकाच युनिफॉर्म मध्ये म्हणजे ड्रेस कोड मध्ये होते.
दादा भुसे यांनी ही गोष्ट पाहिली आणि त्यांना या शिक्षकांचे विशेष कौतुक वाटले. यामुळे मंत्री महोदयांनी या शिक्षकांचे मनापासून कौतुक केले. यावेळी त्यांनी शाळेचे, शाळेतील शिक्षकांचे आणि स्टाफचे अभिनंदन केले.
एवढेच नाही तर अजंग शाळेतील शिक्षकांचा आदर्श घेत राज्यभरातील शिक्षकांसाठी सारखाच राज्यव्यापी ड्रेस कोड लागू केला जाईल अशी मोठी घोषणा देखील यावेळी दादा भुसे यांनी केली.
खरे तर एकीकडे शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या निधीला कात्री लावली जात आहे. लाडकी बहीण योजनेसारख्या कल्याणकारी योजनेमुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर मोठा ताण आला असल्याने अनेक योजनांच्या अंमलबजावणीत अडचणी निर्माण होत आहेत.
तर दुसरीकडे शिक्षकांसाठी आता एक नवीन ड्रेस कोड लागू केला जाणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील शालेय शिक्षकांना नवा ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. दादा भुसे यांनी अजंग येथील शाळेला भेट दिली अन यावेळी याबाबत सुतोवाच केले.
महत्त्वाची बाब म्हणजे मंत्री भुसे यांनी शिक्षकांच्या ड्रेस कोड साठी शालेय निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची मोठी घोषणा सुद्धा यावेळी केली आहे.
यामुळे आता आगामी काळात शालेय शिक्षकांच्या ड्रेस कोड संदर्भात फडणवीस सरकारकडून नेमका काय निर्णय घेतला जातो? शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून खरच राज्यातील शालेय शिक्षकांना नवीन ड्रेस कोड लागू होणार का? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.
पण जर समजा सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आणि यासाठी शासन निधी उपलब्ध करून देण्यात आला तर नक्कीच शिक्षकांसाठी हा एक मोठा निर्णय राहणार आहे.