महाराष्ट्रातील शिक्षकही आता विद्यार्थ्यांप्रमाणे गणवेशात दिसणार, लागू होणार नवा ड्रेस कोड ! शालेय मंत्री दादा भुसे यांची माहिती

राज्यातील शिक्षकांसाठीही विद्यार्थ्यांप्रमाणेच नवीन ड्रेस कोड लागू होण्याची शक्यता आहे. स्वतः राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याबाबत माहिती दिली आहे. आता आपण दादा भुसे नेमके काय म्हणालेत याबाबत माहिती पाहुयात.

Updated on -

Maharashtra Schools : राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्या कुटुंबात कोणी शिक्षक म्हणून कार्यरत असेल किंवा तुम्ही स्वतः शिक्षक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्रातील शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांप्रमाणे गणवेशात दिसणार आहेत.

महाराष्ट्रातील सर्व शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू होण्याची शक्यता आहे. राज्याचे शालेय मंत्री आणि मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांनी याबाबत सुतोवाच केले आहे. विशेष म्हणजे यासाठी शासन निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची ही माहिती भुसे यांनी यावेळी दिली.

काय म्हणालेत दादा भुसे

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य मतदार संघाचे आमदार आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमात बोलतांना शिक्षकांच्या ड्रेस कोड बाबत सुतोवाच केले.

त्यांनी राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना लवकरच ड्रेसकोड लागू करण्यात येणार असून, यासाठी शासनाकडून निधीची तरतूद करण्यात येणार अशी माहिती यावेळी दिली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की अजून येथील शाळेत झालेल्या या कार्यक्रमात ओएनजीसी व अवंत फाऊंडेशनच्या CSR उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक डेस्क आणि शालेय बॅग्स वाटप करण्यात आल्या.

यावेळी मंत्री दादा भुसे यांनी अजंग येथील शाळेचे शाळेतील कर्मचाऱ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. अजंग येथील शाळेतील सर्व कर्मचारी एकाच गणवेशात होते आणि यामुळे दादा भुसे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

तसेच मंत्री भुसे म्हणाले की, शिक्षकांनी सुद्धा शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी भुमिकेत असावे, यासाठी ड्रेसकोड उपयुक्त ठरणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही गणवेशात दिसल्यास शाळेचा अनुशासन व एकात्मतेचा संदेश जाईल, असे सुद्धा भुसे यांनी यावेळी म्हटले आहे.

यावेळी मंत्री महोदयांनी शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थी शाळेत नियमित यावे, पालकांनी मुलांशी संवाद साधावा आणि शाळांनी सहलीसारखे उपक्रम राबवावेत, अशा सूचना सुद्धा त्यांनी यावेळी दिले आहेत.

दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना भुसे यांनी जर शिक्षकांना ड्रेसकोड लागू झाला तर राज्याच्या शिक्षणव्यवस्थेत सकारात्मक बदल होईल, असा विश्वास सुद्धा व्यक्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe