Snake Viral News : साप दिसला तरी आपली पायाखालची जमीन सरकते. खरे तर भारतात फार बोटावर मोजण्याइतकेच साप विषारी आहेत पण असे असले तरी देशात दरवर्षी हजारो लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार देशात दरवर्षी जवळपास 90 हजाराच्या आसपास लोक साप चावल्यामुळे मरण पावतात.
हेच कारण आहे की लोकांना सापांची मोठ्या प्रमाणात भीती वाटते. दरम्यान, भारतात सापांविषयी अनेक दंतकथा सुद्धा आहेत. यामुळे लोकांमध्येच सापांबाबत वेगवेगळे गैरसमज तयार झालेले आहेत.

त्यामुळे अनेक लोक साप दिसला की लगेचच त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. परंतु साप हे पर्यावरणासाठी महत्त्वाचे आहेत आणि यामुळे सापांना जीवदान देणे आवश्यक असून त्यांचे संवर्धन होणे हे काळाची गरज आहे.
त्यामुळे जर तुमच्या घरात अचानक साप घुसला तर तुम्ही सर्वांना मारायला नको. दरम्यान आज आपण घरात साप दिसला तर कोणत्या उपाययोजना करायला हवेत जेणेकरून साफ घरातून पळून जाईल याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
साप घरात घुसला तर काय करणार
अनेकजण साप घरात घुसला की घाबरतात आणि त्याला मारायला सुटतात. मात्र असे करायला नको असे केल्यास साप आक्रमक बनतात आणि मग अशावेळी साप चावण्याची शक्यता बळावते. साप घरात घुसल्यानंतर शांत राहून जास्त आरडाओरडा न करता काही उपाययोजना करायला हव्यात.
सर्वप्रथम घराचा घुसल्यानंतर ते घर रिकामे करा आणि सापाला एकटे राहू द्या. म्हणजे जर घरात साप शिरला तर त्याला एकटे सोडले पाहिजे. पण, जर तुम्हाला वाटत असेल की साप तुमच्यासाठी धोकादायक असलेल्या क्षेत्रात शिरला आहे, तर तुम्ही अशावेळी त्याला मारण्याचा प्रयत्न न करता सर्प मित्राशी संपर्क साधायला हवा.
तसेच, सापांना घरातून पळून लावण्यासाठी काही वस्तूंचा आपण वापर करू शकतो. खरंतर सापांना तीव्र वासाचा त्रास होतो, म्हणून जर घरात साप शिरला तर आपण अशा काही वस्तूंचा वापर करू शकतो ज्यातून तीव्र वास येतो.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार साफ घरात घुसला की आपण फिनाईल, व्हिनेगर किंवा रॉकेल शिंपडू शकतो. यासोबत लसूण, लिंबू, दालचिनी आणि पुदिना देखील टाकू शकतो. कारण या पदार्थांचा फारच तीव्र वास येतो.
यामुळे साप या पदार्थांच्या वासाने पळून जातात. एवढेच नाही तर जाणकार लोकांनी सापांना तापमानातील बदलांची भीती वाटते म्हणून घरात लपलेल्या सापाला धुराच्या मदतीने सुद्धा हाकलून लावले जाऊ शकते अशी माहिती यावेळी दिलेली आहे.