मुंबईला मिळणार दुसऱ्या बुलेट ट्रेनची भेट ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार बुलेट ट्रेन, 767 किलोमीटर लांबीच्या कॉरिडोरवर 11 स्थानके

महाराष्ट्राला लवकरच आणखी एका नव्या बुलेट ट्रेन ची भेट मिळणार आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला दुसऱ्या बुलेट ट्रेन मार्गाची भेट मिळणार असल्याचे स्पष्ट होत असून नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता गती देण्यात आली आहे.

Published on -

Mumbai Bullet Train Project : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय रेल्वेत अनेक मोठमोठे बदल पाहायला मिळाले आहेत. या नव्या बदलांमुळे आता रेल्वेचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक आरामदायी आणि सुपरफास्ट झाला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे कडून आता वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हायस्पीड ट्रेन सुरू केल्या जात आहेत.

महत्त्वाची बाब अशी की आगामी काळात देशात हायड्रोजन ट्रेन सुद्धा सुरू होणार आहे. दुसरीकडे बुलेट ट्रेन चे काम देखील अगदीच युद्धपातळीवर सुरू आहे. देशातील पहिले बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावणार असून सध्या या प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्णत्वाकडे नेले जात आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 मध्ये खुला होऊ शकतो असा दावा केला जात आहे. असे असतानाच आता देशातील दुसऱ्या एका महत्वाच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

मुंबई ते हैदराबाद यादरम्यानही बुलेट ट्रेन धावणार असून याच प्रकल्पाबाबत आता एक नवीन माहिती हवी आहे. खरे तर हा बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई, पुणे आणि हैदराबाद या महानगरांना जोडणार आहे.

दरम्यान केंद्रातील सरकारकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या मुंबई–हैदराबाद हाय-स्पीड रेल्वे (MHHSR) प्रकल्पाला आता गती देण्यात आली आहे. खरेतर या प्रकल्पामुळे महाराष्ट्र व तेलंगणातील प्रवास अधिक जलद आणि सुकर होणार आहे.

यामुळे मुंबई ते हैदराबाद दरम्यान जलद, सुरक्षित अन आरामदायी प्रवास करता येणार आहे. आता आपण हा प्रकल्प नेमका कसा आहे याबाबत माहिती पाहणार आहोत तसेच यावर किती स्थानके विकसित होतील या संदर्भातही डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.

कसा आहे रूट?

या मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट बाबत बोलायचं झालं तर याची लांबी ही जवळपास 767 किलोमीटर इतकी राहणार आहे. या बुलेट ट्रेन कॉरिडोर वर 11 स्थानके विकसित केली जाणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2019 मध्ये केंद्रातील सरकारने बुलेट ट्रेनचे 6 मार्ग घोषित केले होते.

दरम्यान या सहा बुलेट ट्रेन प्रकल्पांमध्ये मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा देखील समावेश होतो. सध्या स्थितीला या प्रकल्पाचे काम प्रारंभिक टप्प्यात आहे. या प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2020 पासून या प्रकल्पासाठी सर्वेक्षण व निविदा प्रक्रिया सुरू आहे.

यामुळे आता लवकरच या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती जाणकारांकडून प्राप्त होत आहे आहे. दरम्यान हा मार्ग खुला झाल्यानंतर यावर 350 किलोमीटर प्रतितास या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे. ही बुलेट ट्रेन 25 किव्ही एसी ओव्हरहेड ट्रॅक्शन आणि डिजिटल सिग्नलिंग प्रणाली वापरणार आहे. तसेच याच्या प्रत्येक गाडीत सुमारे 750 प्रवासी बसण्याची क्षमता असेल.

ही असतील बुलेट ट्रेन मार्गावरील 11 स्थानके

मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन मार्गावर अकरा स्थानके विकसित केली जाणार आहेत महत्त्वाचे म्हणजे यापैकी 8 स्थानके आपल्या महाराष्ट्रातील आहेत. बांद्रा-कुर्ला, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, करकुंब / दौंड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी ( गुलबर्गा ), जहीराबाद आणि हैदराबाद या 11 ठिकाणी स्थानके विकसित होणार आहेत. यामुळे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पापेक्षा मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट महाराष्ट्रासाठी अधिक महत्त्वाचा ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News