Maharashtra Bus News : मुंबई, पुणे नाशिक ही तीन शहरे महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखले जातात. यातील नाशिक शहराला वाईन सिटी म्हणून ओळख प्राप्त आहे. दरम्यान याच वाईन सिटी मध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे एसटी महामंडळाने नाशिकला 25 एप्रिल 2025 ते 25 जून 2025 या काळासाठी जादा म्हणजेच अतिरिक्त बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यामुळे या काळात नासिक वरून विविध शहरांसाठी जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. परिणामी लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

खरे तर राज्यात रेल्वे प्रमाणे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. म्हणून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या जशी वाढते तशीच लाल परीने प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते. दरम्यान नासिक मधील एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते आणि याच अनुषंगाने नाशिक हुन पुणे आणि धुळे साठी जादा बसेस चालवल्या जाणार आहेत. या दोन्ही शहरांसाठी नाशिक वरून दर पंधरा मिनिटांनी बस सोडली जाणार असल्याची माहिती हाती आली आहे. महत्वाची बाब अशी की, उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात नाशिक ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास सुद्धा वेगवान होणार आहे.
कारण की नाशिकहून छत्रपती संभाजीनगरसाठी देखील दर अर्ध्या तासाला बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. एवढेच नाही तर जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठीही जादा बसेस उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर आली आहे. याशिवाय, नाशिकहून सप्तशृंगीगड, त्र्यंबकेश्वर, शिर्डी यांसारख्या धार्मिक स्थळांसाठी सुद्धा नवीन बसेस सुरू केल्या जाणार आहेत
या शहरा दरम्यान ई-बस चालवल्या जाणार आहेत. परिणामी या तीर्थक्षेत्रांना भेटी देणाऱ्या नाशिककरांना दिलासा मिळेल अशी आशा आहे. तसेच, नाशिकहून शिवाजीनगर (पुणे), धुळे, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, सटाणा यांसाठी दर अर्ध्या तासाला बसेस चालवल्या जाणार अशी माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
दरम्यान नाशिक आगार 1 मधून नाशिक चोपडा, नाशिक – धुळे आणि नाशिक – छत्रपती संभाजी नगर या बसेस सोडल्या जाणार आहेत. तसेच नाशिक आगार 2 मधून नंदुरबार जळगाव पाचोरा श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या बसेस सोडल्या जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नक्कीच एस टी महामंडळाच्या निर्णयामुळे नाशिक वरून प्रवास करणाऱ्या लाल परी च्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. म्हणूनच महामंडळाच्या निर्णयाचे एसटी प्रवाशांकडून तोंड भरून कौतुक केले जात असून उन्हाळी सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये सुद्धा लाल परीचा प्रवास आरामदायी होईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त होत आहे.