‘या’ महिन्यात सुरु होणार देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ! देशाला मिळणार तब्बल 80 वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट

भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेच्या माध्यमातून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेने वंदे भारत ट्रेन सुद्धा सुरू केली आहे आणि आता वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सुरू होणार आहे.

Published on -

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता देशात वंदे भारत स्लीपर ट्रेन सुद्धा सुरू होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन.

ही गाडी पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. सध्या स्थितीला ही गाडी देशातील जवळपास 76 हुन अधिक महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे.

महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत 11 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची भेट मिळालेली आहे. पण सध्याच्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू चेअर कार प्रकारातील आहेत. मात्र, लवकरच आता शयनयान वंदे भारत एक्सप्रेस म्हणजेच स्लीपर ट्रेन वंदे भारत सुरू होणार आहे.

भारतात आता वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार असून या गाडीमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी आरामदायी आणि वेगवान होणार आहे. कारण या गाडीमध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.

दरम्यान, रेल्वेसाठी 80 वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार केल्या जाणार असून यासाठी टिटागढ रेल सिस्टीम्स लिमिटेड (TRSL) आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) ला 24,000 कोटी रुपयांचा करार मिळालाय. म्हणून भारताच्या स्वदेशी रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हे एक मोठे पाऊल आहे असा दावा जाणकारांकडून केला जात आहे.

यामुळे देशभरातील वंदे भारत स्लीपर ट्रेनचे जाळे मजबूत होईल. या करारांतर्गत, TRSL आणि BHEL भारतीय रेल्वेसाठी 80 वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार करतील. तसेच, मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत केलेल्या या करारामध्ये 35 वर्षांच्या देखभाल कराराचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.

या स्लीपर ट्रेन्सच्या निर्मितीसाठी समर्पित उत्पादन लाइनचे उद्घाटन 25 एप्रिल 2025 रोजी पश्चिम बंगालमधील TRSL च्या उत्तरपारा प्लांटमध्ये करण्यात आले. ही सुविधा इंडस्ट्री 4.0 तंत्रज्ञान आणि रोबोटिक सिस्टीमने सुसज्ज आहे आणि एकाच छताखाली स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमचे दोन्ही डबे तयार करणारे भारतातील एकमेव युनिट सुद्धा आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेन ही भारतातील पहिली सेमी-हायस्पीड लांब पल्ल्याची ट्रेन असेल ज्यामध्ये पूर्णपणे स्वदेशी डिझाइन, ऊर्जा-कार्यक्षम ऑपरेशन, आधुनिक कोच लेआउट आणि प्रगत सुरक्षा प्रणाली राहणार आहे.

या गाड्यांचा वेग, आराम आणि स्मार्ट ऑनबोर्ड वैशिष्ट्ये एकत्रित करून रात्रीचा प्रवास सुधारण्यासाठी तयार करण्यात आला आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन बाबत बोलायचं झालं तर या चालू आर्थिक वर्षात म्हणजे 2025 – 26 या आर्थिक वर्षात वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रत्यक्षात रुळावर धावण्याची शक्यता आहे.

ही गाडी देशातील मुंबई पुणे दिल्ली नागपूर कोलकत्ता वाराणसी लखनऊ अशा महत्त्वाच्या शहरांमधून धावताना दिसणार आहे. मुंबई ते दिल्ली या मार्गावर सुद्धा ही गाडी सुरू होऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe