राज्यातील शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! नवीन शैक्षणिक वर्षात ‘या’ दिवशी शाळा सुरू होणार !

राज्यातील शालेय शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिक्षण संचालनालयाने नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केलेले आहे. आज आपण याच परिपत्रकात दिलेली माहिती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published on -

Maharashtra Schools : राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून नुकतेच एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

हे परिपत्रक शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग, सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक (उत्तर/पश्चिम/दक्षिण), बृहन्मुंबई यांना पाठवण्यात आले आहे.

या परिपत्रकात राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची शैक्षणिक वर्ष 2024-25 ची उन्हाळी सुट्टी आणि नवीन शैक्षणिक वर्ष अर्थातच 2025 26 शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान आता आपण या परिपत्रकानुसार राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांच्या शाळा म्हणजेच नवीन शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार याबाबतचा आढावा घेणार आहोत. 

कधी सुरु होणार नवीन शैक्षणिक वर्ष?

शिक्षण संचालनालयाच्या या परिपत्रकान्वये नवीन शैक्षणिक वर्ष नेहमीप्रमाणे जून महिन्यात सुरु होणार आहे. खरेतर, शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

यानुसार, शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची उन्हाळी सुटटी दोन मे 2025 पासून जाहीर करण्यात आली आहे. म्हणजे राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवार, दिनांक 02 मे 2025 पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

मात्र, राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सूटी जाहीर करण्याबाबतचा निर्णय हा शाळा प्रशासन त्यांच्या स्तरावर घेणार असल्याची माहिती जाणकार लोकांनी दिली आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाबाबत बोलायचं झालं तर, पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये 16 जून 2025 रोजी सुरू होणार आहे. म्हणजेच 16 जूनला विद्यार्थ्यांच्या शाळा उघडणार आहेत. परंतु विदर्भातील शाळा या थोड्या उशिराने उघडतील.

परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार 23 जून 2025 ते 28 जुन 2025 पर्यंत सकाळ सत्रात 7.00 ते 11.45 यावेळेत सुरु केल्या जाणार आहेत. तसेच विदर्भातील शाळा सोमवार 30 जून 2025 पासून नियमित वेळेत सुरु केल्या जाणार आहेत. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe