Shirdi News : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही महाराष्ट्रात रस्त्यांच्या विकासाची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरात सुद्धा रस्त्यांच्या कामांनी चांगलाच वेग पकडलेला आहे.
दरम्यान, येत्या दोन वर्षांनी अर्थातच 2017 मध्ये नाशिक येथे कुंभमेळा आयोजित होणार असून या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी संपूर्ण जगभरातील भाविक गर्दी करणार आहेत.

या ठिकाणी करोडोच्या संख्येने भाविक दाखल होतील आणि सहाजिकच यातील असंख्य लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आणि शनिशिंगणापूर या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना देखील भेटी देणार आहेत. शिर्डी आणि शनिशिंगणापूर या ठिकाणी जगभरातील हिंदू सनातनी लोक गर्दी करत असतात.
साहजिकच कुंभमेळ्याच्या दिवसांमध्ये ही गर्दी आणखी वाढणार आहे. दरम्यान हीच बाब विचारात घेऊन आता राज्य शासनाच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. शिर्डी मधील दोन रस्त्यांच्या कामासाठी नुकताच कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून
येत्या काही दिवसांनी निविदा प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात या मार्गांचे काम सुरू होणार आहे. शिर्डी मधील एका रस्त्याचे चौपदरीकरण आणि एका महत्त्वाच्या रस्त्याचे तीन पदरीकरण केले जाणार असून यासाठी तब्बल 230 कोटी रुपयांचा भरीव निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. दरम्यान, आता आपण याच रस्त्यांची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.
सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक- शिर्डी रस्ता व शिर्डी विमानतळाहून नाशिकला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही रस्त्यांना 230 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला असून यामुळे
या रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या अंतर्गत पिंपरी निर्मळ ते निमोण मार्गे नाशिक या रस्त्याचे काम केले जाणार आहे. हा रस्ता चारपदरी बनवला जाणार आहे आणि त्यासाठी 165 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. या रस्त्याची लांबी ही जवळपास 22 किलोमीटर हुन अधिक आहे आणि याची रुंदी ही 15 ते 16 मीटर इतकी राहणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या रस्त्याच्या मधोमध दीड मीटरचा दुभाजक असेल, झाडेही लावले जातील, या रस्त्यावर तीन ठिकाणी जंक्शन विकसित होतील तर काही ठिकाणी भव्य कमानीही असतील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त होत आहे. तसेच भविष्याचा विचार करून विजेचे खांब उभारण्यासाठी पाईपलाइन सुद्धा टाकण्यात येणार असल्याची माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे.
दुसरीकडे विमानतळ ते जुना नाशिक रस्ता या रस्त्याचे काम सुद्धा केले जाणार आहे. कोल्हार-लोणी मार्गे जुना नाशिक रस्ता शिर्डी विमानतळाशी जोडण्यात येणार अशी माहिती जाणकारांकडून मिळाली आहे. हा एक 13.8 किलोमीटर लांबीचा आणि तीन पदरी रस्ता असेल. या रस्त्यासाठी 65 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. शिवाय काकडी विमानतळ परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात येणार आहे.