महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उत्तर व दक्षिण भारताला जोडणारी नवीन रेल्वे गाडी सुरू, ‘या’ Railway स्टेशनवर थांबणार

रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक नवी गाडी सुरू होणार असून या गाडीमुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. ही गाडी येत्या पाच तारखेपासून रुळावर धावताना दिसणार आहे. आठवड्यातून पाच दिवस ही ट्रेन चालवली जाणार असल्याने याचा प्रवाशांना नक्कीच फायदा होईल.

Published on -

Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. ही रेल्वेगाडी उत्तर व दक्षिण भारताला जोडणार असून ही गाडी आपल्या महाराष्ट्रातून धावणार असल्याने राज्यातील रेल्वे प्रवाशांना देखील या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.

महत्वाचे म्हणजे या गाडीला राज्यातील अनेक महत्त्वाच्या स्थानावर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. येत्या पाच तारखेपासून ही गाडी सुरू होणार असून आज आपण याच नव्या एक्सप्रेस ट्रेन च्या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस राहणार नव्या गाडीचे वेळापत्रक

मिळालेल्या माहितीनुसार चेन्नई सेंट्रल ते भगत की कोठी या दरम्यान नवीन रेल्वे गाडी चालवली जाणार आहे. या नव्या गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ही एक्सप्रेस ट्रेन पाच मे पासून रुळावर धावणार आहे.

रेल्वेने सांगितल्याप्रमाणे चेन्नई सेंट्रल – भगत की कोठी एक्सप्रेस (गाडी क्रमांक 20625) येत्या सोमवारपासून आठवड्यातून पाच दिवस चालवली जाणार आहे. ही गाडी बुधवार आणि शनिवार वगळता चेन्नई सेंट्रल येथून 19.45 वाजता सोडली जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी 12.15 वाजता भगत की कोठी येथे पोहोचणार आहे.

तसेच परतीच्या प्रवासात भगत की कोठी – चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस (गाडी क्रमांक 20626) सात तारखेपासून म्हणजेच येत्या बुधवारपासून चालवली जाणार आहे. ही सुद्धा गाडी आठवड्यातून पाच दिवस धावणार आहे.

आठवड्यातील शनिवार आणि मंगळवार वगळता ही गाडी भगत की कोठी येथून साडेपाच वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 23.15 वाजता चेन्नई सेंट्रल येथे पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?

 मिळालेल्या माहितीनुसार पाच तारखेपासून सुरू होणाऱ्या नव्या एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या स्थानकावर देखील ही गाडी थांबणार आहे.

राज्यातील बल्लारशाह, चंद्रपूर, वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार या रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबा घेणार असल्याची माहिती रेल्वे कडून देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News