शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! बीएडचा त्रास संपला, आता शिक्षक बनण्यासाठी ‘हा’ कोर्स करावा लागणार !

तुम्हालाही सरकारी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करायची आहे का ? मग आजची ही बातमी तुमच्या कामाचे आहे. खरे तर शिक्षक बनण्यासाठी बीएडची पदवी घ्यावी लागते. मात्र नव्या शैक्षणिक धोरणानुसार बीएड पदवी रद्द करण्यात आली असून त्या ऐवजी एक नवा कोर्स करण्यात आला आहे. आता आपण याच नव्या कोर्सची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 

Published on -

Maharashtra Schools : देशभरातील शिक्षकांसाठी विशेषतः ज्यांना आगामी काळात शिक्षक बनायचे आहे आणि यासाठी तयारी करत आहेत अशा उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर देशभरातील लाखो तरुणांचे सरकारी शाळेतील शिक्षक बनण्याचे स्वप्न असेल आणि यासाठी संबंधित तरुणांच्या माध्यमातून तयारी देखील केली जात असेल.

मात्र शिक्षक बनण्यासाठी बीएड पदवी घ्यावी लागते. सध्याच्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक बनण्यासाठी बीएड पदवी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र नवीन शैक्षणिक धोरणानुसार म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत आता शिक्षक बनण्यासाठी बीएड पदवी घेणे बंधनकारक राहणार नाही.

नव्या शैक्षणिक धोरणात बीएड पदवीचा कोर्स रद्द करण्यात आला आहे. तसेच या नव्या शैक्षणिक धोरणात बीएड ऐवजी आता एक नवीन कोर्स सुरू करण्यात आला आहे. म्हणजेच आता शिक्षक बनण्यासाठी बीएडचा त्रास संपला आहे, त्या जागेवर आता नवीन कोर्स लॉन्च केला जातोय.

दरम्यान, आज आपण या नवीन कोर्स बाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यामुळे जर तुम्हीही सरकारी शिक्षक बनण्यासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची राहणार आहे.

बीएडची गरजच नाही ! 

सध्या सरकारी शाळेत शिक्षक म्हणून रुजू व्हायचे असेल तर उमेदवारांना ग्रॅज्युएशन नंतर बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजेच b.ed चा कोर्स करावा लागतो. तथापि, नवीन शिक्षण धोरणांतर्गत म्हणजेच न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत बीएड कोर्स रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासाठी, बीएडऐवजी एक नवीन कोर्स सुरू करण्यात आला आहे. या कोर्सचे नाव आयटीईपी किंवा इंटिग्रेटेड टीचर्स एज्युकेशन प्रोग्राम म्हणजेच एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम असे आहे. हा कोर्स एनसीटीई म्हणजेच शिक्षकांच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय परिषद शिक्षकांनी तयार केला आहे.

नवीन कोर्स कसा आहे?

हा नवा कोर्स चार वर्षांचा आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये हा कोर्स सुरू सुद्धा करण्यात आला आहे. या कोर्समध्ये शिक्षकांना फाउंडेशनल, प्रिपरेटरी, मिडिल आणि सेकेंडरी टप्प्यासाठी तयार करण्यात येणार आहे. बीएड ग्रॅज्युएशन नंतर करता येते.

मात्र हा चार वर्षांचा नवा कोर्स बारावी नंतर करता येणार आहे. नव्या आयटीईपी कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एनसीईटी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. दरम्यान ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना रँकच्या आधारे महाविद्यालयाचे वाटप केले जाणार आहे.

दरम्यान, आयटीईपी कोर्स पूर्ण केल्यानंतर, शिक्षक होण्यासाठी टीईटी, एसटीईटी किंवा राज्यस्तरीय परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मग उमेदवार शिक्षक होण्यास पात्र बनतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News