Vande Bharat Sleeper : वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता भारतात वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. बंद भारत एक्सप्रेस ही देशातील स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन. ही गाडी पहिल्यांदा 2019 मध्ये सुरू झाली. यानंतर टप्प्याटप्प्याने ही गाडी देशातील महत्त्वाच्या मार्गांवर सुरू झाली. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली होती.
सध्या स्थितीला मात्र ही गाडी देशातील बहुतांशी मार्गांवर धावत आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर ही गाडी राज्यातील 11 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे या गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय.

दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस च्या अभूतपूर्व यशानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सुरू होणार आहे. सध्या सुरू असणारी वंदे भारत एक्सप्रेस ही चेअरकार प्रकारातील आहे मात्र लवकरच रेल्वे कडून शयनयान प्रकारातील वंदे भारत चालवली जाणार आहे म्हणजेच स्लीपर वंदे भारत ट्रेन धावणार आहे.
दरम्यान आता वंदे भारत स्लीपर ट्रेन बाबत एक नव अपडेट हाती आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याला लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन ची भेट मिळणार आहे. अशा परिस्थितीत, आज आपण पुण्यावरून सुरू होणाऱ्या या वंदे भारत स्लीपर ट्रेनची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार रूट?
मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते दिल्ली दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे लवकरच ही गाडी रुळावर धावताना दिसणार आहे. ही गाडी 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावणार असून यामुळे पुणे ते दिल्ली या दरम्यानचे 1589 किलोमीटरचे अंतर ही गाडी फक्त वीस तासात पूर्ण करू शकते अशी माहिती देण्यात आली आहे.
म्हणजेच या गाडीमुळे पुणे ते दिल्ली हा प्रवास वेगवान होणार आहे. त्यामुळे पुण्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होईल आणि पुणेकरांना दिलासा मिळेल अशी आशा आहे. खरे तर या ट्रेन साठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रयत्न केले होते आणि त्यांचाच हा प्रयत्न आता यशस्वी होताना दिसतोय.
कस असणार वेळापत्रक?
पुणे दिल्ली वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ही ट्रेन नवी दिल्लीहून सायंकाळी साडेचार वाजता रवाना होणार आहे आणि रात्री एक वाजता पुणे स्थानकावर पोहोचणार आहे. तसेच ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून दुपारी तीन वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30 मिनिटांनी ही गाडी राजधानी दिल्लीत पोहोचणार आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन कोण कोणत्या स्थानकावर थांबणार?
पुणे – दिल्ली दरम्यान सुरू केल्या जाणाऱ्या वंदे भारत ट्रेन ला महाराष्ट्रातील फक्त एकाच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर राहणार असे सुद्धा बोलले जात आहेत. ही वंदे भारत ट्रेन या मार्गावरील मथुरा, आग्रा कॅन्ट, ग्वाल्हेर, भोपाळ जंक्शन, खंडवा आणि भुसावळ या महत्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे म्हणजेच राज्यातील फक्त भुसावळ या एकमेव स्थानकावर ही गाडी थांबण्याची शक्यता आहे.