Maharashtra Schools : आज राज्य बोर्डाचा एचएससी अर्थातच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. खरंतर राज्य बोर्डाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी यावर्षी दहावी आणि बारावीचा निकाल वेळेच्या आधीच जाहीर केला जाणार असे सांगितले गेले होते.
स्वतः राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी 15 मे 2025 पर्यंत दोन्ही वर्गांचे म्हणजे दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे निकाल जाहीर होतील अशी माहिती दिली होती आणि यानुसार आज पाच मे 2025 रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज जाहीर झालाय, यात लाखो विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे. दरम्यान राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
ही बातमी आगामी काळात बारावीला प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की बारावीच्या वर्गाचा अभ्यासक्रम आता बदलणार आहे. दरम्यान आता आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
निकाल कसा राहिला ?
राज्य बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी बारावीच्या निकालाची टक्केवारी 91.88% इतकी राहिली आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची निकालाची टक्केवारी थोडीशी घसरलेली आहे.
आज निकाल जाहीर करताना मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत स्वतः ही माहिती दिली. यावेळी गोसावी यांनी राज्यातील 3373 परीक्षा केंद्रांपैकी 124 केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले असल्याची माहिती यावेळी दिली.
तसेच राज्यात बारावीच्या परीक्षेत एकूण 374 कॉपी प्रकरणांची नोंद झालीये असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील पुणे, नागपूर आणि लातूर विभागात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार आढळले असून संबंधित केंद्रांवर कारवाई केली जाणार अशी माहिती यावेळी समोर आली आहे.
बारावीचा अभ्यासक्रम कधी बदलणार?
यावर्षी बारावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींचे निकाल 94.58% इतका लागला असून मुलांचा निकाल 89.51% लागला आहे. दरम्यान नवीन शैक्षणिक धोरणानुसार बारावीचा अभ्यासक्रम लवकरच चेंज केला जाणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली अशी.
मिळालेल्या माहितीनुसार नव्या शैक्षणिक धोरणानुसार बारावीचा अभ्यासक्रम 2027 – 28 पासून लागू होण्याची शक्यता आहे. राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. दरम्यान या बदलामुळे विद्यार्थ्यांना अधिक सुसंगत आणि स्पर्धात्मक अभ्यासक्रमाची संधी मिळणार असा विश्वास देखील गोसावी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.