भारतातील टॉप 10 मेडिकल कोर्सेस कोणते आहेत ? एकदा ऍडमिशन घेतलं की करिअर सेट, 100% लाखोंचा पगार मिळणार

सध्या सर्वत्र दहावी आणि बारावीच्या निकालाची चर्चा सुरू आहे. आज महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बारावी तर झाली पण आता पुढे काय करायचे ? हा मोठा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान आज आपण बारावी नंतरचे बेस्ट मेडिकल कोर्सेस नेमके कुठले आहेत याच संदर्भातील आढावा आजच्या या लेखातून घेणार आहोत. 

Updated on -

Top 10 Medical Courses : आज महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. गेल्या अनेक दिवसांपासून बारावीच्या निकालाची चर्चा सुरू होती आणि अखेर कार आज बोर्डाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली.

दरम्यान आता बारावीनंतर पुढे काय करायचं कोणता कोर्स करायचा असे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ निर्माण करताना दिसत आहेत. खरे तर, बारावीनंतर अनेक जण मेडिकल आणि इंजीनियरिंग फिल्डकडे वळतात.

मेडिकल कॉलेजमध्ये आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इंट्रान्स टेस्ट द्यावी लागते आणि यासाठी राज्यातील लाखो विद्यार्थी अर्ज करतात. दरम्यान आज आपण देशातील टॉप 10 मेडिकल कोर्सेस ची माहिती जाणून घेणार आहोत. खरंतर, मेडिकल मध्ये फक्त BAMS किंवा MBBS असेच कोर्सेस असतात आणि मेडिकल फील्ड म्हणजेच फक्त डॉक्टर होणे असाच समज असतो.

मात्र, पण मेडिकल इंडस्ट्री खरे तर खूप मोठी आहे, दरम्यान आज आपण याच मेडिकल फील्ड मधील टॉप 10 कोर्सेस ची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण जात दहा कोर्सेस बाबत जाणून घेणार आहोत ते कोर्सेस फारच महत्त्वाचे आहेत आणि हे कोर्स कम्प्लीट केल्यानंतर लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी मिळू शकते   

भारतातील टॉप 10 मेडिकल कोर्सेस

1)MBBS : आजच्या काळात वैद्यकीय शिक्षण घेणं ही केवळ डॉक्टर होण्यासाठीची एकमेव वाट नसून अनेक पर्याय विद्यार्थ्यांसमोर खुले झाले आहेत. मेडिकल फील्डमध्ये जर करिअर करायचे असेल तर विद्यार्थी साडेपाच वर्षांचा पारंपरिक MBBS कोर्स करू शकतात.

2)BAMS : बीएएमएस, ज्याचा अर्थ “बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी” असा आहे. या अभ्यासक्रमाला तुम्ही बारावीनंतर जाऊ शकता. यात आयुर्वेद आणि आधुनिक औषधाची तत्त्वे एकत्रित केली आहेत आणि हा एक साडेपाच वर्षांचा अभ्यासक्रम आहे. यात 1 वर्षाचा इंटर्नशिपचा सुद्धा समावेश आहे. म्हणजे या अभ्यासक्रमामध्ये साडेचार वर्षाचे शैक्षणिक सत्र असते आणि एक वर्षाचा 4.5 वर्षांचा शैक्षणिक सत्र आणि 1 वर्षाचा इंटर्नशिप प्रोग्रामचा समावेश असतो.

3)BHMS (होमिओपॅथी) :  BHMS म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी हा कोर्स पाच वर्षांचा असून यामध्ये एका वर्षाची इंटर्नशिप सुद्धा असते.

4)BUMS (युनानी) : BUMS म्हणजे बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सायन्स हा सुद्धा कोर्स साडेपाच वर्षांचा आहे आणि यामध्ये एका वर्षाच्या इंटर्नशिपचा सुद्धा समावेश होतो.

5)BSMS (सिद्ध औषध) : बॅचलर ऑफ सिद्ध मेडिसिन आणि सर्जरी हा साडेपाच वर्षांचा कोर्स आहे. यामध्ये एका वर्षाचा इंटर्नशिपचा सुद्धा समावेश होतो.

6)BNYS (निसर्गोपचार आणि योग) : बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्सेस हा सुद्धा साडेपाच वर्षांचा कोर्स आहे आणि यामध्ये सुद्धा एका वर्षाची इंटर्नशिप अनिवार्य आहे.

7)BPT (फिजिओथेरपी) : हा 4 वर्षांचा अभ्यासक्रम सुद्धा एक उत्तम पर्याय ठरतो. हा कोर्स शरीर रचनेवर केंद्रित आहे. 8)BVSc : मेडिकल फील्डमध्ये आणखी एक कोर्स येतो जो पशु वैद्यकीय क्षेत्राशी निगडित आहे. पशुवैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी BVSc हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामुळे, जर तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये करिअर करायची असेल तर तुम्ही हे कोर्स कन्सिडर करू शकता.

मेडिकल फिल्डमधील पोस्टग्रॅज्युएट कोर्स 

9)मास्टर ऑफ सर्जरी MS :वर सांगितलेल्या कोर्स व्यतिरिक्त मेडिकल फील्डमध्ये आणखी असंख्य कोर्सेस आहेत. काही पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस सुद्धा आहेत. म्हणजेच असे कोर्स जे की ग्रॅज्युएशन नंतर केले जातात. जर तुम्ही MBBS केले आणि नंतर तुम्हाला यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे असेल तर तुम्ही MS (मास्टर ऑफ सर्जरी) हा 3 वर्षांचा पोस्टग्रॅज्युएट कोर्स तुम्ही करू शकता.

10)MD (डॉक्टर ऑफ मेडिसिन) : MBBS नंतर एमडी अर्थातच डॉक्टर हा पोस्टग्रॅज्युएट कोर्स तुम्ही करू शकता. हा पण कोर्स 3 वर्षांचा स्पेशलायझेशन कोर्स आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe