‘हे’ आहेत मेडिकलचे टॉप 5 युनिक कोर्सेस ! 12वी नंतर या कोर्सेसला ऍडमिशन घेतल्यास लाईफ सेट म्हणून समजा

बारावीनंतर काय करायचे असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का ? मग तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा राहणार आहे. आज आपण बारावी नंतर केल्या जाणाऱ्या टॉप पाच मेडिकल कोर्सेसची माहिती जाणून घेणार आहोत. 

Published on -

Top 5 Medical Courses : सध्या महाराष्ट्रात सर्वत्र राज्य बोर्डाच्या बारावीचा निकालाची चर्चा सुरू आहे. यंदा बारावीचा निकाल वेळेच्या आधीच जाहीर करण्यात आला असून काल पाच मे 2025 रोजी दुपारी एक वाजता राज्य बोर्डाकडून निकाल सार्वजनिक करण्यात आला आहे. दरम्यान निकाल लागल्यापासून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कोर्सेस बाबत विचारणा केली जात आहे.

राज्यातील लाखो विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याच्या तयारीत असून त्यांच्याकडून टॉपच्या मेडिकल कोर्सेस बाबत विचारणा होत आहे. दरम्यान आज आपण मेडिकलचे असे पाच युनिक कोर्स जाणून घेणार आहोत, ज्याची अनेकांना माहिती सुद्धा नसेल. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊयात मेडिकलचे टॉप पाच युनिक कोर्सेस कोणते आहेत?

B.Sc. in Sports Medicine and Rehabilitation :  तुम्हाला बारावीनंतर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असेल तर तुमच्यासाठी बी.एससी. इन स्पोर्ट्स मेडिसिन आणि रिहॅबिलिटेशन हा कोर्स परफेक्ट ऑप्शन ठरू शकतो. खरंतर अलीकडे खेळांना आणि खेळाडूंना विशेष महत्त्व दिले जात आहे.

सरकार सुद्धा खेळांना प्रोत्साहित करत असून विविध प्रकारच्या खेळांमधील खेळाडूंचा सत्कार करत आहे. सरकार खेळाडूंना मोटिवेट करण्याचे काम करत आहे. अशा परिस्थितीत बीएससी इन स्पोर्ट्स मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन हा कोर्स करून तुम्ही स्पोर्ट्स इंडस्ट्री मध्ये आपले एक चांगले वैद्यकीय करियर बनवू शकता.

जर तुम्हाला फिटनेस आणि खेळांमध्ये रस असेल, तर स्पोर्ट्स मेडिसिन आणि रिहॅबिलिटेशनमध्ये बी.एससी. करणे हा तुमच्यासाठी एक उत्तम राहणार पर्याय आहे. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, या कोर्समध्ये खेळाडूंच्या दुखापती, पुनर्प्राप्ती, पुनर्वसन आणि आरोग्य व्यवस्थापन शिकवले जाते. त्यात फिजिओथेरपी, स्पोर्ट्स न्यूट्रिशन आणि दुखापती प्रतिबंधक यासारखे विषय समाविष्ट असतात.

बीएससी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन हेल्थकेअर : बारावीनंतर मेडिकल फिल्डमध्ये जायचे असेल तर तुमच्यासाठी हा कोर्स फायद्याचा राहणार आहे. हा एक असा युनिक कोर्स आहे ज्यात एआय आणि मशीन लर्निंगच्या मदतीने वैद्यकीय निदान स्मार्ट बनवले जाते.

आरोग्य डेटाचे विश्लेषण करून रोग कसे ओळखायचे आणि उपचारांमध्ये तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करायचा अशा गोष्टी या कोर्स मधून शिकता येतात. अलीकडे यायचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून हेल्थकेअर सेक्टर देखील यापासून वंचित राहिलेले नाही. यामुळे जर तुम्हाला हेल्थकेअर सेक्टरमध्ये करिअर करायच असेल तर तुम्ही हा कोर्स नक्कीच निवडू शकता आणि आपले करिअर सेट करू शकता.

बी.एससी. इन न्यूक्लियर मेडिसिन टेक्नॉलॉजी : या यादीतला तिसरा कोर्स म्हणजेच बीएससी इन न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजी. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना किरणोत्सर्गी तंत्रज्ञानाचा वापर करून रोगांची ओळख आणि उपचार कसे करायचेत याबाबत शिक्षण दिले जाते.

यामध्ये पीईटी स्कॅन, एसपीईसीटी आणि रेडिओथेरपी सारख्या साधनांचा वापर केला जातो. हा कोर्स केल्यानंतर कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर मध्ये तुम्हाला लाखो रुपयांची नोकरी मिळू शकते. म्हणजेच हा कोर्स केला की तुमच आयुष्य सेट होणार आहे.

बीएससी इन मेडिकल जेनेटिक्स : या यादीतला चौथा कोर्स म्हणजेच बीएससी इन मेडिकल जेनेटिक्स. मेडिकलक्षेत्रातील तज्ञ लोक सांगतात की, हे एक वेगाने वाढणारे क्षेत्र आहे, ज्यामध्ये डीएनए चाचणी, अनुवांशिक विकार आणि दुर्मिळ आजारांवर संशोधन समाविष्ट असते.

आजच्या काळात, अनुवांशिक समुपदेशन आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेमध्ये याची खूप आवश्यकता असून यामुळे अनेक विद्यार्थी या कोर्सला ऍडमिशन घेत आहेत. यामुळे जर तुमचाही हेल्थकेअर सेक्टरमध्ये जाण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही बारावीनंतर या कोर्सला ऍडमिशन घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकता.

बी.एससी. इन न्यूरोइलेक्ट्रोफिजियोलॉजी : या यादीतला शेवटचा कोर्स म्हणजेच बीएससी इन न्यूरोइलेक्ट्रोफिजियोलॉजी. जर तुम्हाला काही कारणास्तव एमबीबीएसला ऍडमिशन भेटले नाही तर तुम्ही हा कोर्स करू शकता. हेल्थकेअर सेक्टरमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हा कोर्स फारच मौल्यवान आहे. हा असा कोर्स आहे जो मेंदू आणि नसांच्या क्रियाकलापांचे परीक्षण करण्यास शिकवतो.

यामध्ये, EEG, EMG सारख्या चाचण्या शिकवल्या जातात, ज्या न्यूरोलॉजिकल रुग्णांच्या तपासणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. हा कोर्स केल्यानंतरही तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. या अभ्यासक्रमातून पदवी घेतल्यानंतर सरकारी तसेच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News