शनिदेव 30 वर्षानंतर येणार मित्राच्या घरी; ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार सगळं काही, कोण भाग्यवान? वाचा

Published on -

न्यायाधिश समजले जाणारे शनि महाराज 30 वर्षानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. गेल्या 29 मार्चला शनी देवाने स्वतःची कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश केला. मीन राशीवर गुरु ग्रहाचे राज्य असते. ज्योतीषशास्त्रानुसार गुरु व शनी या ग्रहांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असतात. त्यामुळे शनीच्या या राशीबदलामुळे काही राशींना खूप चांगला परिणाम पहायला मिळणार आहे.

मिथून राशी

शनिदेवाची प्रत्यक्ष चाल या राशीसाठी खूप फायद्याची ठरणार आहे. शनिदेव मिथुन राशीच्या कर्मभावात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या कामात व नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या मिथुन राशीच्या लोकांनाही त्यांच्या कामातून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. सरकारी कामातही यश मिळू शकते. शिवाय मिथुन राशीच्या लोकांचे पद व प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिथुन राशीच्या बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यताही शनिदेव निर्माण करतील, असे सांगितले जात आहे.

मीन राशी

मीन राशीच्या लोकांना शनिदेव थेट अनुकूल ठरणार आहेत. शनिदेव मीन राशीच्या चौथ्या घरात येणार आहेत. त्यामुळे या काळात या राशीच्या लोकांच्या सुखसोयी वाढणार आहेत. वाहन व मालमत्ता खरेदी करण्याचे योगही येणार आहेत. तुमच्या व्यवसायात व जीवनात यामुळे आनंद येणार आहे. नवीन व्यवहारात नफा होणार आहे. कौटुंबिक जिवनात आनंद व शांती राहणार आहे. नवीन व्यवहारातून फायदा होणार आहे. शनिदेव हे कर्माचे स्वामी आहेत. तुमच्या राशीचे 12 वे घर आहे. त्यामुळे तुमचे शनिदेव पैसेही वाचवणार आहे. तसेच तुम्हाला तुमच्या कामात व व्यवसायात प्रगती देणार आहेत.

वृषभ राशी

शनिदेवाची ही चाल वृषभ राशीच्या लोकांना फायदेशीर ठरणार आहे. शनिदेव या राशीच्या लोकांच्या थेट उत्पन्नाच्या घरात येणार आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. उत्पन्नाची नवीन साधने निर्माण होणार आहेत. या काळात वृषभ राशीच्या लोकांच्या लोकांच्या सुखसोयी वाढतील. आर्थिक सुधारणा होईल. गुंतपणुकीत नफा होईल. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग येतील. सट्टेबाजी किंवा लाँटरी खेळणाऱ्या लोकांनाही यातून चांगला फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe