सापांची भीती वाटते का ? मग ‘या’ सुगंधी वनस्पतीची घराशेजारी लागवड करा, साप घराच्या आजूबाजूलाही दिसणार नाहीत

साप हा असा एक विषारी प्राणी आहे ज्याची सर्वांना भीती वाटते. खरे तर भारतात सापाच्या असंख्य प्रजाती आढळतात. मात्र यातील सर्वच प्रजाती विषारी आहेत असे नाही, तर काही बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती विषारी आहेत. पण तरीही देशात सर्पदंशामुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो. यामुळे आज आपण अशा काही वनस्पतींची माहिती जाणून घेणार आहोत, ज्याची लागवड केल्यास साप घराच्या आजूबाजूला सुद्धा येत नाही. 

Published on -

Snake Viral News : भारतात दरवर्षी सर्पदंशामुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो. असे म्हणतात की, भारतात दरवर्षी 70 ते 80 हजार लोक साप चावल्याने मरण पावतात. यामुळे आपण सर्वजण सापांना मोठ्या प्रमाणात घाबरतो. साप फक्त डोळ्याला दिसला तरी देखील आपल्या अंगाचा थरकाप उडतो.

दरम्यान जर तुम्हालाही सापांची भीती वाटत असेल आणि नेहमीच साप घरात घुसेल की काय अशी जर धास्ती तुमच्या मनात बसली असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही वनस्पतींची माहिती सांगणार आहोत ज्या वनस्पतीपासून साप नेहमीच चार हात लांब राहतो.

आज आपण ज्या सुगंधी वनस्पतींची माहिती पाहणार आहोत त्या वनस्पती जर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात, परसबागेत किंवा बागेत लावल्यात तर तुमच्या घराच्या आजूबाजूला साप फिरकणार सुद्धा नाहीत.

या वनस्पतीपासून साप नेहमीच लांब पडतात

Chives : मिळालेल्या माहितीनुसार ही एक औषधी वनस्पती आहे. चाईव्हजचा उपयोग सूप, सॅलड, आणि भाज्यांमध्ये केला जातो. असं म्हणतात की या वनस्पतीला कांद्यासारखी चव असते आणि या वनस्पतीचा वास देखील कांद्या सारखाच येतो.

दरम्यान या वनस्पतीचा कांद्यासारखा हा वास सापांना अजिबात आवडत नाही आणि यामुळे ही वनस्पती तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला लावली तर साप तुमच्या घरात घुसणार सुद्धा नाही. या वनस्पतीचे सायंटिफिक नाव ॲलियम स्कोनोप्रासम असे आहे.

सोसायटी गार्लिक : सोसायटी गार्लिक ही एक शोभेची वनस्पती असून तुम्ही ही वनस्पती तुमच्या अंगणात किंवा घरात लावू शकता. तुम्ही एखाद्या पॉटमध्ये ही वनस्पती लावून घरात ठेवायला काही हरकत नाही या वनस्पतीला सुंदर फुले येतात आणि या वनस्पतीचा वापर सापांना अजिबात आवडत नाही.

Geranium : तुम्ही जिरेनियम या औषधी वनस्पतीची सुद्धा लागवड करू शकता. ही औषधी वनस्पती वेगवेगळ्या आजारांमध्ये उपयोगी आहे. आयुर्वेदात या वनस्पतीला विशेष महत्त्व देण्यात आले असून या वनस्पतीच्या तेलाला बाजारात  मोठी मागणी असते.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही वनस्पती तुम्ही तुमच्या अंगणात लावली तर साप घरात येण्याची भीती सुद्धा दूर होते कारण की सापांना या वनस्पतीचा तीव्र वास आवडत नाही.

Thyme : ही एक सुगंधी वनस्पती असून या वनस्पतीचा सुगंध हा सापांना आवडत नसल्याचे बोलले जाते. तुम्ही या वनस्पतीची लागवड इनडोर तसेच आउटडोर दोन्ही ठिकाणी करू शकता. म्हणजेच बाहेर अंगणात किंवा परसबागेत तुम्ही याची लागवड करू शकता आणि घरात तुम्ही तुमच्या खिडक्यांमध्ये किंवा गच्चीवर सुद्धा हे रोप ठेवू शकता.

रोजमेरी : रोजमेरी हे सुद्धा एक शोभेचे झाड आहे आणि अनेकजण आपल्या अंगणात तसेच घरात या झाडाची लागवड करतात. महत्त्वाचे म्हणजे या वनस्पतीचा तीव्र वास सापांना आवडत नाही. त्यामुळे साप या वनस्पती पासून लांब राहणे पसंत करतात. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe