GK 2025 : तुमच्यापैकी अनेकजण कम्पुटर किंवा लॅपटाँपवर काम करत असाल. लॅपटॉप असो किंवा डेस्कटॉप तुम्हाला सर्व मानक कीबोर्डमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे कीबोर्डवरील फक्त F आणि J या दोन बटणावर छोट्या दोन रेषा दिसतात. यामागे एक खास कारण असते. ते कारण काय असते, तेच आपण या बातमीतून पाहूयात…
काय आहे कारण?
कीबोर्डच्या F आणि J बटणांवरील उंचावलेल्या रेषा फार कमी लोकांना लक्षात येतात. परंतु त्यांचा उद्देश केवळ डिझाइन हा नसून टायपिंग सोपे आणि जलद करणे हा आहे. हे व्यावसायिक टायपिंगसाठी ‘होम पोझिशन’ सेट करतात. हे वैशिष्ट्य ISO आणि ANSI कीबोर्ड डिझाइन मानकांचा भाग आहे. टच टायपिंग म्हणजेच न पाहता टाइप करणे जे F आणि J बटणांनी सुरू होते. तुमचे अंगठ्याच्या बाजूचे बोट ज्याला आपण इंडेक्स फिंगर म्हणतो, ते या दोन बटणांवर ठेवले जाते. या रेषांच्या मदतीने बोटे त्यांच्या योग्य जागी स्थिर राहण्यास मदत होते.

टायपिंगला होते मदत
F आणि J या दोन्ही बटणांवर इन्डेक्स फिंगर ठेवल्यानंतर इतर बोटे आपसूकच इतर बटणांवर सेट होतात. कीबोर्डवर जेवढी बटने आहेत त्या बटणांवर आपल्या हाताची सगळी बोटे सहज जातात. सर्व बटणांपर्यंत सहज पोहोचता येते. म्हणून, ही बटणे बोटांसाठी मार्गदर्शक रेषा म्हणून निवडली गेली आहेत. कीबोर्ड बनवणाऱ्या अभियंत्यांनी या छोट्या ओळींद्वारे वापरकर्त्याना सुलभ अनुभव मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत. हे एक छोटेसे सूचक आहे जे तुमच्या बोटांना मार्गदर्शन करते.
मार्गदर्शक ठरतात रेषा
ज्यांना टच टायपिंग येते त्यांच्यासाठी या रेषा खूप उपयुक्त आहेत. हे बोटांना योग्य स्थितीत ठेवतात, ज्यामुळे टायपिंगचा वेग आणि अचूकता वाढते. म्हणजेच या रेषा टायपिंग करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरतात. जर तुम्ही कमी प्रकाशात किंवा अंधारात टाइप करत असाल, तर या उंचावलेल्या रेषा तुम्हाला दिशा देतात. स्क्रीन किंवा कीबोर्डकडे न पाहताही तुम्ही बटण शोधू शकता. जे टायपिंग शिकत आहेत त्यांच्यासाठी या F आणि J च्या रेषा खूप मदत करतील. यामुळे त्यांना न पाहता टाइप करण्याची सवय लागण्यास मदत होते.