महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार चौथी वंदे भारत एक्सप्रेस ! सरकार दरबारी चर्चा अंतिम टप्प्यात, कुठून कुठपर्यंत धावणार?

सध्या महाराष्ट्रातून 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. मात्र येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात आणखी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसणार आहे. दरम्यान आज आपण याच वंदे भारत एक्सप्रेस चा रूट बाबत माहिती पाहणार आहोत.

Published on -

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन. ही ट्रेन सुरुवातीला 2019 मध्ये धावली. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि त्यानंतर देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली.

आतापर्यंत देशाला एकूण 136 वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळालेली आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्याला आतापर्यंत अकरा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळालेल्या आहेत.

महत्वाची बाब अशी की लवकरच राज्याला बारावी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार असून याच संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे.

या मार्गावर धावणार बारावी वंदे भारत एक्सप्रेस

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील दोन राजधान्यांना कनेक्ट करण्यासाठी आता वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे. सांस्कृतिक राजधानी पुणे आणि उपराजधानी नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार असून पुणे – नागपूर वंदे भारत एक्सप्रेस चा संदर्भातील चर्चा सुद्धा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे.

म्हणजेच येत्या काही दिवसांनी प्रत्यक्षात ही गाडी रुळावर धावताना दिसणार असून यामुळे पुणे ते नागपूर हा प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर पुणे ते नागपूर या रेल्वे मार्गावर दररोज शासकीय, निमशासकीय आणि खाजगी सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसह अन्य प्रवाशांची मोठी वर्दळ असते.

हेच कारण आहे की आता पुणे ते नागपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाकडून पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस च्या संदर्भात अभ्यास केला जात असून याबाबतची चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. स्वतः रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबतची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मध्ये पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस बाबत सकारात्मक चर्चा सुद्धा झालेली आहे.

सध्या या मार्गावरील प्रवासी वेळ, प्रवासी क्षमता आणि वेळापत्रकाचा अभ्यास सुरू असून लवकरच ही ट्रेन जाहीर करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नागपूर आणि पुण्याला चौथी वंदे भारत ट्रेन

सध्या उपराजधानी नागपूर येथून नागपूर ते सिकंदराबाद नागपूर ते इंदोर आणि नागपूर ते बिलासपूर या तीन मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुणे रेल्वे स्थानकावरून पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या दोन थेट वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत

तर दुसरीकडे मुंबई येथील सीएसएमटी ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन देखील पुणे मार्गे चालवली जाते. दरम्यान आता पुणे ते नागपूर दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवली जाणार असून ही गाडी सुरू झाल्यानंतर

पुण्याला आणि नागपूरला चौथी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. यामुळे पुणेकरांना आणि उपराजधानी नागपूर येथील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून यामुळे राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसचे नेटवर्क आणखी सक्षम होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News