पुणेकरांसाठी खुशखबर ! अजूनपर्यंत ज्या ठिकाणी मेट्रो गेलेली नाही तो भागही आता मेट्रोने कनेक्ट होणार, ‘या’ भागात धावणार Metro ?

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा विकासाचा वेग गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढला आहे. यामुळे या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या देखील वाढली आहे आणि याच समस्येचे निराकरण करण्यासाठी मेट्रोचा पर्याय पुढे आलाये. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये मेट्रो प्रकल्पांचे कामे हाती घेण्यात आली आहेत.

Published on -

Pune Metro News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब, स्पर्धा परीक्षांचे केंद्र म्हणून संपूर्ण देशात ख्यातनाम असणाऱ्या पुणे शहरात सध्या मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहेत. पुण्यातील वाहतूक कोंडी वर रामबाण उपाय म्हणून मेट्रोकडे पाहिले जात असून शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील अधिका अधिक भाग मेट्रोने जोडला जावा यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

सध्या स्थितीला पुण्यात दोन मेट्रोमार्ग सुरू आहेत, ते मार्ग म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी. महत्त्वाची बाब अशी की या दोन्ही मेट्रो मार्गांचा विस्तार करण्याचे सुद्धा नियोजन आहे आणि विस्तारित मेट्रो मार्गासाठी सुद्धा शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.

यामुळे आगामी काळात पुण्यातील बहुतांशी भाग मेट्रो कनेक्टिव्हिटीने सज्ज होणार आहे आणि यामुळे पुणेकरांना नक्कीच वाहतूक कोंडी पासून दिलासा मिळेल अशी आशा आहे. अशातच आता ज्या ठिकाणी अजून पर्यंत मेट्रो पोहोचलेली नाही तिथे मेट्रो सुरु करण्यात यावी यासाठी पाठपुरावा सुरू झालाय.

पुणे मेट्रो लोणावळ्यापर्यंत चालवली गेली पाहिजे अशी आग्रही मागणी आता पुढे येत आहे. यासाठी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतारली असून यासाठी मनसे कडून जोरदार पाठपुरावा सुद्धा सुरू करण्यात आला आहे.

या मार्गावर मेट्रो सुरु करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोणावळ्यापर्यंत मेट्रो सुरु झाली पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी उपस्थित केली आहे. मनसेने निगडी ते लोणावळा या मार्गावर मेट्रो चालवली गेली पाहिजे असे निवेदन दिले असून यामुळे आगामी काळात खरंच लोणावळ्यापर्यंत मेट्रोने जाता येणे शक्य होणार का ? या विचाराने पुणेकर अतिउत्साही बनले आहेत.

जर लोणावळ्यापर्यंत मेट्रो सुरु झाली तर लोणावळा या प्रसिद्ध पर्यटन स्थळाच्या विकासाला आणखी चालना मिळणार आहे. वीकेंडला लोणावळ्याला जाणाऱ्या पर्यटकांना या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे.

खरे तर मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांची भेट घेऊन या संदर्भातील एक सविस्तर निवेदन सादर केले आहे, ज्यात निगडी ते लोणावळा अशी मेट्रो सुरु करण्यात यावी असा उल्लेख आहे आणि याचा डीपीआर लवकरात लवकर तयार झाला पाहिजे अशी मागणी सुद्धा यामध्ये करण्यात आली आहे. 

लोणावळ्याला मेट्रोची आवश्यकता काय ? 

चिखले यांनी आपल्या निवेदनात असे नमूद केले आहे की पुण्याजवळील भाग आता वेगाने विकसित होत आहेत. देहूरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत आणि लोणावळा हे भागही अधिक जलद गतीने विकसित होत आहेत.

यामुळे या परिसरातील लोकसंख्या वाढीचा वेग गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच भविष्यात ही लोकसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी मेट्रो सुविधा अत्यंत आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News