Pune News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे पुणे शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे कडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर, रेल्वे बोर्डाकडून पुण्यातील हडपसर ते जोधपूर या मार्गावर ही गाडी चालवली जाणार आहे.
हडपसर – जोधपूर – हडपसर या नवीन एक्सप्रेस ट्रेन ची घोषणा झाल्यानंतर काही कारणास्तव ही गाडी रद्द करण्यात आली होती. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही गाडी रद्द करण्याचा मोठा निर्णय बोर्डाकडून घेण्यात आला होता.

पण आता परिस्थिती पुन्हा एकदा आटोक्यात आली असल्याने ही गाडी पुन्हा एकदा पूर्ववत करण्यात आली असल्याची माहिती पुणे रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या गाडीमुळे हडपसर ते जोधपुर हा प्रवास वेगवान होणार आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे रद्द झाली होती ट्रेन
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, भारत-पाकिस्तान युद्धामुळे देशाच्या सीमाभागातील राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला होता. या अलर्टमुळे सीमा भागातील अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय सुद्धा रेल्वे कडून घेण्यात आला होता. राजस्थान सारख्या सीमा भागातील राज्यांमध्ये जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांवर निर्बंध घालण्यात आले होते.
याच पार्श्वभूमीवर हडपसर-जोधपूर-हडपसर रेल्वेसेवा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला होता तर दुसरीकडे पुणे-जम्मू तवी-पुणे एक्सप्रेस सेवा शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली होती आणि ही गाडी फक्त दिल्लीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पण आता परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आली असल्याने रेल्वेकडून हडपसर जोधपुर एक्सप्रेस ट्रेन पुन्हा एकदा पूर्ववत करण्यात आली आहे. काल, दि. 11 मे 2025 पासून ही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. एकीकडे हडपसर – जोधपुर एक्सप्रेस ट्रेन पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
तर, दुसरीकडे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेली पुणे-जम्मू तवी-पुणे एक्सप्रेस सुद्धा थेट शेवटच्या स्थानकापर्यंत चालवली जाणार आहे म्हणजेच ही गाडी दिल्लीपर्यंत न चालवता थेट जम्मूतवीपर्यंत धावणार असल्याची माहिती रेल्वे कडून यावेळी देण्यात आली आहे. यामुळे पुण्याहून जम्मू कडे जाणाऱ्या प्रवाशांना देखील दिलासा मिळणार आहे.
कोणकोणत्या स्थानकावर थांबणार?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की हडपसर ते जोधपुर दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या नव्या एक्सप्रेस ट्रेनला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मिळालेला आहे. ही गाडी राज्याबाहेरील पाली, मारवाड, अबू रोड, पालनपूर, मेहसाना, अहमदाबाद, बडोदरा, सुरत, वापी, या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे तर राज्यातील वसई रस्ता, कल्याण, लोणावळा, चिंचवड या ठिकाणी थांबा मंजूर झालेला आहे.