रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ 1449 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, कसा असणार रूट ?

देशात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची मोठी चर्चा सुरू आहे. या गाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ही गाडी नेहमीच चर्चेत राहते. दुसरीकडे आता या गाडीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुद्धा सुरू केली जाणार आहे.

Vande Bharat Sleeper Train : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे वंदे भारत स्लीपर ट्रेन संदर्भात. खरंतर, वंदे भारत एक्सप्रेस या देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन. ती गाडी सुरुवातीला 2019 मध्ये सुरू झाली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने या गाडीचे नेटवर्क वाढवण्यात आले.

सध्या स्थितीला देशातील अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वंदे भारत ट्रेन सुरू आहे. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात सध्याच्या घडीला 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत.

दुसरीकडे आगामी काळात महाराष्ट्राला आणखी काही नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट सुद्धा मिळणार आहे. दरम्यान, वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता भारतीय रेल्वेकडून वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सुरू केली जाणार असून ही गाडी आपल्या महाराष्ट्राला सुद्धा मिळणार आहे.

राज्यातील मुंबई ते नागपूर या व्यस्त रेल्वे मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार अशी बातमी समोर आली आहे. यामुळे मुंबई ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या दोन्ही शहरा दरम्यान शासकीय निमशासकीय तसेच प्रायव्हेट कर्मचारीसह इतर प्रवाशांची नियमित गर्दी पाहायला मिळते आणि याच गर्दीच्या अनुषंगाने या व्यस्त रेल्वे मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याची रेल्वेची योजना असल्याचे बोलले जात आहे.

तथापि, याबाबतचा संपूर्ण निर्णय हा रेल्वे बोर्डाकडून घेतला जाणार आहे, यामुळे रेल्वे बोर्ड या मार्गावर खरच वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवणार का आणि ही गाडी कधीपर्यंत प्रवाशांच्या सेवेत येणार ? ही गोष्ट पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. दुसरीकडे मुंबई – नागपूर या रेल्वे मार्गासह देशातील आणखी एका महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.

‘या’ मार्गावर पण धावणार वंदे भारत स्लीपर

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेकडून 1,449 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाणार आहे. दिल्ली ते हावडा या मार्गावर ही ट्रेन धावणार असून यामुळे 1,449 किलोमीटर लांबीचा प्रवास हा अवघ्या पंधरा तासांमध्ये पूर्ण होईल अशी सुद्धा माहिती समोर आली आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेन ही ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणार आहे. खरे तर सध्या या मार्गावर राजधानी एक्सप्रेस आणि दुरांतो एक्सप्रेस धावत आहे. मात्र वंदे भारत स्लीपर ट्रेनचा वेग या दोन्ही एक्सप्रेस गाड्यांपेक्षा अधिक राहणार आहे आणि यामुळे दिल्ली ते हावडा यादरम्यानचा प्रवास वेगवान होईल अशी माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे.

कस राहणार नव्या गाडीचे वेळापत्रक ? 

भारतीय रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन नवी दिल्लीहून संध्याकाळी 5 वाजता सोडली जाणार आहे आणि हावडा येथे सकाळी 8 वाजता पोहोचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात ही हाय स्पीड ट्रेन हावडा येथून संध्याकाळी 5 वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता दिल्लीला पोहोचणार आहे. 

कोण – कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार ? 

 रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली ते हावडा दरम्यान धावणारी वंदे भारत स्लीपर या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. ही गाडी कानपूर सेंट्रल, प्रयागराज जंक्शन, डीडी उपाध्याय जंक्शन, गया जंक्शन, धनबाद जंक्शन आणि आसनसोल जंक्शन येथे थांबणार अशी माहिती देण्यात आली आहे.

किती असणार तिकीट ? 

दिल्ली – हावडा वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट दर कसे असतील याबाबतही मीडिया रिपोर्टमध्ये मोठा दावा करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या ट्रेनचे एसी 3-टायर भाडे सुमारे 3000 रुपये, एसी 2-टायरचे भाडे 4000 रुपये आणि फर्स्ट क्लास एसी भाडे 5100 रुपये राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News