अंकशास्त्रावर विश्वास ठेवणारे अनेक लोक असतात. आपल्या जन्मतारखेवरुन आपले भविष्य जाणता येते, यावरही अनेकांचा विश्वास असतो. प्रत्येकाची जन्मतारीख ही त्याचा मुलांक असतो. हाच मुलांक कोणत्यातरी एका ग्रहाला संबोधित करत असतो. तोच ग्रह आपल्या आयुष्यात चढ-उतार देतो, यावर कित्येक लोक विश्वास ठेवतात. असाच एक मुलांक आहे, ज्याच्या लग्नात शनिदेवामुळे विलंब होतो.
कुणाच्या लग्नात होतो विलंब?
आज आपण 8 या अंकाबद्दल बोलत आहोत. ज्या लोकांची जन्मतारीख 8, 17 आणि 26 आहे त्यांचा मुलांक 8 असतो. या संख्येच्या लोकांवर शनीचा विशेष प्रभाव असतो. शनिदेवाच्या कृपेमुळे हे लोक आयुष्यात भरपूर पैसा आणि प्रसिद्धी मिळवतात. परंतु त्यांना त्यांच्या प्रेम जीवनाबद्दल अनेकदा काळजी वाटते. या अंकाच्या लोकांबद्दल असे म्हटले जाते की, त्यांचे लग्न सहसा उशिरा होते.

कसे असतात हे लोक?
ज्या लोकांचा मुलांक 8 आहे ते लोक स्वभावाने शांत, गंभीर आणि शुद्ध असतात. ज्याप्रमाणे शनि हा अवकाशात हळूहळू फिरणारा ग्रह मानला जातो, त्याचप्रमाणे या संख्येचे लोक देखील हळूहळू यश मिळवतात. जर या संख्येचे लोक त्यांचे ध्येय साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करत राहिले तर ते अत्यंत यशस्वी होतात. समाजात चांगले नाव कमावते.
कसे असते प्रेमजीवन?
आपण 8 क्रमांकाच्या लोकांच्या प्रेम जीवनाबद्दल आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोललो, तर त्यांना या बाबतीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांचे प्रेमसंबंध कायमचे नसतात. त्यांना त्यांचे प्रेम उघडपणे व्यक्तही करता येत नाही. ज्यामुळे त्यांच्या नात्यात नेहमीच संघर्षाची परिस्थिती असते. या अंकाचे लोक सहसा उशिरा लग्न करतात. त्यांचे लग्न 29-30 वर्षांच्या वयात किंवा त्यानंतर होते. त्यांच्या कौटुंबिक जीवनातील आनंदात काही अडथळा येऊ शकतो. या मुलांकांचे बरेच लोक तर लग्नच करत नाहीत, असाही दावा केला जातो.