सर्वसामान्य कुटुंबात एकच टु-व्हिलर अनेकजण वापरतात. त्यामुळे अनेकदा गाडीत पेट्रोल किती शिल्लक आहे, हे तपासले जात नाही. त्यामुळे ऐन रस्त्यात गोची होते आणि पेट्रोल संपतं. रस्त्याने जाताना अनेकजण दुचाकी लोटताना दिसतात. परंतु काही जण पेट्रोल संपण्याच्या गोष्टीतही जुगाड शोधतात. आज आम्ही असेच दोन जुगाड तुम्हाला सांगणार आहोत.
रस्त्यातच होते गोची
दुचाकीस्वार त्यांच्या दुचाकींमध्ये पेट्रोल संपण्यापूर्वीच पेट्रोल भरतात . पण कधीकधी इंधन इंडिकेटरमध्ये बिघाड असल्याने, पेट्रोल कधी संपले हे तुम्हाला कळत नाही. अशा परिस्थितीत जर तुमच्या बाईकचे पेट्रोल निर्जन ठिकाणी संपले तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. अनेकदा घाईगडबडीत आपण पेट्रोल तपासत नाही व नंतर ते मध्येच संपल्यावर आपल्याला त्रास होतो.

बाईकची ही ट्रिक वापरा
आपल्या गाडीतील पेट्रोल संपतं, तेव्हा पूर्ण टाकी कधीच कोरडी होत नाही. जे पेट्रोल गाडीच्या नळीपर्यंत येत नाही ते गाडीच्या टाकीच्या तळाला शिल्लक असतं. आता हेच शिल्लक पेट्रोल गाडीच्या इंजिनपर्यंत आणलं गेलं, तर गाडी किमान एक ते तीन किलोमिटरपर्यंत चालते. त्यामुळे पेट्रोल पंप त्या अंतरावर असेल तर तुम्हाला तेथपर्यंत गाडी लोटण्याची गरज पडत नाही. पण टाकीच्या तळातील हे पेट्रोल मशिनपर्यंत आणायचं कसं, याबाबतच हा जुगाड आहे.
बाईक वाकडी करा
जर तुमच्या बाईकमधील पेट्रोल संपले असेल आणि जवळपास पेट्रोल पंप नसेल, तर सर्वप्रथम तुम्ही तुमची बाईक स्टँडवरून काढून जमिनीवर ठेवावी. म्हणजेत ती जरा वाकडी करावी. असे केल्याने टाकीतील तळाला असलेले पेट्रोल नळीत येते. त्यानंतर तेच नळीतील पेट्रोल मशिपर्यंत जाण्याची वाट पहा. अगदी एखाद्या मिनिटांत ते मशिपर्यंत जाते आणि बाईक चालू होते.
चोकचा वापर करा
आजकाल अनेक बाइक्समध्ये चोक नसते. परंतु ज्या बाइक्समध्ये चोक आहे, त्या पेट्रोल संपल्यानंतरही सहजपणे सुरू करता येतात. त्या तुम्हाला चोक दिल्यानंतर २ ते ३ किमी किंवा कधीकधी त्याहूनही जास्त अंतर कापून देऊ शकतात. गाडी वाकडी करुन किंवा थेट चोक देऊन तुम्ही सहज पेट्रोल पंपापर्यंत पोहचू शकता.