Pune – Danapur Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर दोन एक्सप्रेस गाड्यांना थांबा मंजूर व्हावा अशी मागणी उपस्थित करण्यात आली आहे.
दानापूर – पुणे एक्सप्रेस आणि जम्मू तवी – पुणे झेलम एक्सप्रेसला राज्यातील एका महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात यावा अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून आणि प्रवासी संघटनांकडून उपस्थित केली जात आहे.

या स्थानकावर थांबा देण्याची मागणी
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, उत्तर महाराष्ट्रातील रावेर हे एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील रेल्वे स्थानक म्हणून या स्थानकाला ओळख प्राप्त आहे. या रेल्वे स्थानकातून दररोज हजारो रेल्वे प्रवासी प्रवास करतात.
दरम्यान याच महत्त्वाच्या रावेरस्थानकावर दोन रेल्वे गाड्यांना थांबा मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दानापूर-पुणे एक्सप्रेस आणि जम्मूतवी-पुणे झेलम एक्सप्रेस या गाड्यांना रावेरमध्ये थांबा मिळावा अशी मागणी प्रवाशांकडून उपस्थित करण्यात आली आहे.
या दोन्ही गाड्या रावेर वरून धावतात मात्र रावेरमध्ये थांबत नाहीत आणि त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यांची गैरसोय होते.
यामुळे आता रावेर व आजूबाजूच्या परिसरातील प्रवाशांसाठी या दोन्ही एक्सप्रेस गाड्यांना रावेरमध्ये थांबा मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
रावेरमधील विविध संस्था, संघटना आणि प्रवासी वर्गाच्या वतीने रेल्वे प्रशासनाला लेखी निवेदन सादर करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आणि त्यांच्या सोयीसाठी दानापूर-पुणे एक्सप्रेस आणि जम्मूतवी-पुणे झेलम एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांना रावेर स्थानकावर थांबा मंजूर करण्याची मागणी दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली असून या अनुषंगाने त्यांनी भुसावळचे मंडळ प्रबंधक यांच्याकडे निवेदन सुद्धा सादर केले आहे. त्यामुळे आता या निवेदनावर रेल्वे बोर्डाकडून काय निर्णय होतो हे पाहणे खरंच उत्सुकतेचे राहणार आहे.
रावेर ते पुणे प्रवास होणार वेगवान
जर समजा रेल्वे प्रवासी संघटनांकडून सादर करण्यात आलेल्या या निवेदनावर सकारात्मक निर्णय झाला आणि दानापूर – पुणे एक्सप्रेस ट्रेन आणि जम्मू तवी – पुणे झेलम एक्सप्रेस ट्रेन ला रावेर या ठिकाणी थांबा मंजूर झाला तर रावेरहून पुण्याकडील प्रवास वेगवान होणार आहे.