Pune Best College : महाराष्ट्र राज्य बोर्डाने अलीकडेच दहावीचा निकाल जाहीर केला आहे. 13 मे 2025 रोजी राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. यंदा दहावीचा निकाल थोडासा घसरलाये पण अनेक विद्यार्थ्यांनी दहावीत चांगले यश मिळवले असून आता विद्यार्थी पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी तयारी करत आहेत. दहावीनंतर अनेकजण एफवायजेसी म्हणजेच अकरावीला ऍडमिशन घेण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान जर तुम्हालाही दहावीनंतर अकरावीला प्रवेश घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर दहावी बोर्ड परीक्षा ही आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट असते. यामुळे दहावीला चांगले मार्क मिळावेत आणि दहावीच्या पुढे अकरावीला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावे असे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. दरम्यान जर तुम्हाला अकरावीला पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण पुण्यातील टॉप 10 कॉलेजची माहिती जाणून घेणार आहोत. या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यास विद्यार्थ्यांचे आयुष्य सेट होणार आहे आणि त्यांच्या करिअरसाठी हे कॉलेजस महत्वाचे राहणार आहेत.

‘या’ कॉलेजसमध्ये ऍडमिशन घ्या लाईफ सेट होणार
1)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज
पुण्यात 11वी ला प्रवेश घ्यायचा प्लॅन असेल तर औंढमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज तुम्ही निवडू शकता. तुम्हाला कोणत्याही शाखेत प्रवेश घ्यायचा असेल म्हणजे कला, विज्ञान, वाणिज्य यापैकी कोणत्याही शाखेत प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही या कॉलेजचा विचार करू शकता.
2)इंदिरा कॉलेज
पुण्यातील इंदिरा कॉलेज देखील या यादीत येत. इंदिरा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन तुम्ही देखील तुमचं आयुष्य सेट करू शकता. या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात आणि करिअरसाठी हे कॉलेजच्या नक्कीच फायद्याचे ठरणार आहे.
3)सिम्बोयसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स
या यादीत सिम्बोयसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स या कॉलेजचा सुद्धा समावेश आहे. जर तुम्हाला अकरावी आर्ट्स किंवा कॉमर्सला ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी पुण्यातील हे कॉलेज बेस्ट ठरणार आहे.
4)विवेकानंद कॉलेज
पुण्यातील विवेकानंद कॉलेज हे सुद्धा विद्यार्थ्यांचे एक आवडीचे कॉलेज असतील. या कॉलेजमध्ये तुम्ही अकरावीला ऍडमिशन घेतल्यास तुमचे आयुष्य नक्कीच सेट होईल असं आपण म्हणू शकतो. या कॉलेजमध्ये एक्स्ट्रा करिक्युलम उपक्रम सुद्धा होतात आणि यामुळे विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज मध्ये देखील सहभाग घेता येतो.
5)सर परशुरामभाऊ कॉलेज
पुण्यातील हे कॉलेज सुद्धा फारच नामांकित आहे. जर तुम्हाला अकरावीला ऍडमिशन घ्यायचे असेल तर हे कॉलेज तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे. तुम्ही येथे 11 वी कला, विज्ञान आणि वाणिज्य या शाखांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. इथं कॉम्प्युटर सायन्स सारखे अनेक अभ्यासक्रम सुद्धा उपलब्ध आहेत.
6)एच. व्ही देसाई कॉलेज
पुण्यातील हे कॉलेज देखील फारच नामांकित आहे. दहावीनंतर तुम्हाला अकरावीला ऍडमिशन घ्यायचे असेल तर एच व्ही देसाई कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहणार आहे कारण की येथे तुम्ही आर्ट, सायन्स आणि कॉमर्स मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. या कॉलेजचा कॅम्पस हा खरच पाहण्यासारखा आहे. प्रशस्त कॅम्पस असणारे हे कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा तितकेच लोकप्रिय आहे.
7)मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स
तुम्हाला अकरावीला ऍडमिशन घ्यायचे असेल तर हे सुद्धा कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. या कॉलेजमध्ये कोणत्याही शाखेत तुम्हाला प्रवेश मिळणार आहे.
8)फर्ग्युसन कॉलेज
पुण्यातील सर्वाधिक नामांकित कॉलेजेसमध्ये फरगुशन कॉलेजचा समावेश होतो. या कॉलेजमध्ये देश विदेशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे पुण्यातील सर्वाधिक जुने आणि प्रतिष्ठित कॉलेज असून या ठिकाणी तुम्ही एकदा ऍडमिशन घेतलं म्हणजे तुमच आयुष्य कायमचे सेट होऊ शकते.
9)नावरोसजी वाडिया कॉलेज
दहावीनंतर जर तुम्हाला अकरावी आर्ट्स किंवा सायन्स मध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी हे कॉलेज बेस्ट राहील. या कॉलेजमध्ये तुम्हाला अनेक कोर्सेस उपलब्ध होतात यामुळे अकरावी आणि बारावीनंतरही तुम्ही या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता.
10)एमईएस आबासाहेब गरवारे कॉलेज
दहावीनंतर अकरावीला ऍडमिशन घ्यायचे असेल तर एमईएस आबासाहेब गरवारे महाविद्यालय सुद्धा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहणार आहे.