पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! लोकल प्रवास होणार वेगवान, ‘या’ भागात तयार होणार नवा रेल्वे मार्ग, कसा असणार रूट ?

पुण्यातील लोकल प्रवास आता वेगवान होणार आहे. कारण की पुण्याला एका नव्या रेल्वे प्रकल्पाची भेट मिळणार असून या प्रकल्पामुळे पुणेकरांचा रेल्वे प्रवास अधिक सुपरफास्ट होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

Published on -

Pune Railway News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणे ते लोणावळा दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे.

खरंतर, पुणे ते लोणावळा दरम्यान दररोज हजारो लोक प्रवास करत असतात आणि याच गर्दीच्या अनुषंगाने रेल्वे कडून आता पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी व चौथी रेल्वे लाईन टाकली जाणार आहे.

दरम्यान याच तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेबाबत आता एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. या प्रकल्पाला कधीपर्यंत मंजुरी मिळणार यासंदर्भात एक नवीन माहिती हाती आली आहे.

5 वर्षांपूर्वी डीपीआर तयार! 

खरेतर, एमआरव्हीसी म्हणजे मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडे या प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे. यानुसार एमआरव्हीसीकडून पुणे-लोणावळादरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा पहिला डीपीआर म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल पाच वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता.

पाच वर्षांपूर्वीच हा अहवाल सादर पण करण्यात आला. या प्रकल्पाचा पहिला डीपीआर सादर झाल्यानंतर सुधारित अहवालही राज्य सरकारला देण्यात आला. दरम्यान, गेल्या वर्षी एमआरव्हीसीने राज्य सरकारला अद्ययावत ‘डीपीआर’ सुद्धा दिलाय.

मात्र अजून या प्रकल्पाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही. यामुळे पुणे ते लोणावळा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून हा प्रकल्प बारगळला की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. मात्र आता या प्रकल्पाला गती मिळणार आहे.

रेल्वे मंत्र्यांनी दिली ग्वाही  

रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी पुणे-लोणावळादरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पाबाबत नुकतीच अपडेट दिली. त्यांनी या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू होईल असे सांगितले.

दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्या या विधानानंतर राजधानी मुंबईत या प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि ‘एमआरव्हीसी’च्या अधिकाऱ्यांची या प्रकल्पाच्या संदर्भात नुकतीच महत्त्वाची बैठक संपन्न झाली.

या बैठकीत या प्रकल्पाची कॅबिनेट नोट तयार झाली असल्याची माहिती देण्यात आली आणि येत्या आठवड्यात ही कॅबिनेट नोट कॅबिनेट समिती समोर मांडण्यात येईल आणि त्यानंतर शासन निर्णय जाहीर होईल असे सुद्धा सांगितले गेले.

प्रकल्पाचा खर्च किती?

5 वर्षांपूर्वी या प्रकल्पाचा खर्च 4884 कोटी रुपये एवढा होता मात्र आता यामध्ये 216 कोटींची वाढ झालेली आहे. या रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 5,100 कोटी रुपयांचा खर्च होईल अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकल्पाला लवकरच राज्याची मंजुरी मिळणार असल्याने याचे काम पावसाळ्यानंतर सुरु होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या प्रकल्पाला गती देण्याचे संकेत दिले होते.

हा प्रकल्प पूर्ण झाला की या नव्या मार्गिकांमुळे लोकल आणि मेल एक्सप्रेसगाड्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक मिळणार आहेत. सध्याची जी रेल्वे लाईन आहे ते फक्त लोकलसाठी वापरली जाण्याची शक्यता आहे.

परिणामी, दोन्ही गाड्यांचे वेळापत्रक अधिक अचूक आणि जलद होईल. क्रॉसिंगसाठी थांबावे लागणार नाही, वेळ वाचेल आणि प्रवास सुखकर होईल. या प्रकल्पामुळे पुणे ते लोणावळा हा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe