Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर ही योजना गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये सुरू झालेली राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे.
या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा केले जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण दहा हप्ते देण्यात आले आहेत. या योजनेचा पहिला हफ्ता जुलै 2024 मध्ये जमा झाला.

तेव्हापासून या योजनेचा लाभ दिला जातोय. आतापर्यंत तुला गोष्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 2025 या दहा महिन्यांचा लाभ लाडक्या बहिणींना मिळालेला आहे.
आता मे महिन्याचा लाभ देखील लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्याआधीच मात्र लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
खरे तर लाडकी बहीण योजनेत फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या आणि याच घटनेच्या पार्श्वभूमीवर या योजनेच्या अर्जांची पुन्हा पडताळणी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असल्याचे वृत्त समोर आले.
दरम्यान या पडताळणीनंतर ज्या महिला निकषाबाहेर आहेत आणि याचा लाभ घेत आहेत त्यांना या योजनेतून वगळले जाईल, त्यांचे अर्ज बाद केले जातील अशी माहिती सुद्धा समोर आली आहे.
महिला व बालविकास विभागाकडून या योजनेच्या सर्व अर्जाची पडताळणी होणार असे सांगितले गेले होते. मात्र आता या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे.
या महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार नाही
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या सर्वच अर्जांची पडताळणी केली जाणार नाही. सरकार काही महिला लाभार्थ्यांचे अर्ज पडताळणार नसल्याचे म्हटले जात आहे.
या योजनेतील नियमांचे उल्लंघन करुन लाभ घेतलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत. दरम्यान, यातही काही महिलांचे अर्ज बाद केले जाणार नाहीत. पिवळे व केशऱी रेशनकार्डधारक असलेल्या महिलांच्या अर्जांची तपासणी होणार नाही.