Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींना अकरावा हफ्ता कधीपर्यंत मिळू शकतो या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. अकराव्या हप्त्याची नवीन तारीख नुकतीच समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्या वर्षी सुरु झाली असून या अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा केले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात 10 हप्ते जमा करण्यात आले आहेत.

या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा ऑगस्ट 2024 मध्ये जमा करण्यात आला होता. यानंतर या योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या शेवटी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
तथापि गेल्या एप्रिल महिन्याचा हप्ता हा मे महिन्यात जमा झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 2025 या कालावधीमधील दहा हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
एप्रिल महिन्याचा हप्ता दोन ते तीन मे 2025 दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला असून आता महिलांना या योजनेच्या पुढील हक्काची म्हणजेच 11 व्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे. महत्वाचे बाब अशी की, या योजनेच्या अकराव्या हफ्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
कधी मिळणार अकरावा हफ्ता ?
या योजनेचा 11वा हफ्ता लवकरच खात्यात जमा होणार अशी माहिती समोर येत आहे. खरे तर एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यात मिळाला म्हणून मे महिन्याचा हप्ता म्हणजेच अकरावा हप्ता जून महिन्यात खात्यात येणार की काय असा प्रश्न महिलांकडून उपस्थित होतोये.
पण या योजनेचा मे महिन्याचा हप्ता म्हणजेच अकरावा हप्ता मे महिन्यातच जमा होईल अशी खात्रीलायक बातमी मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात पुढील आठवड्यात जमा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. यामुळे फडणवीस सरकार या संदर्भात कोणता निर्णय घेते या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत खात्यात येतो हे पाहण्यासारखे राहणार आहे.
गेल्या अनेक हफ्त्यांचे पैसे हे त्या त्या महिन्याच्या अखेरिस जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता सुद्धा मे महिन्यातच जमा होईल आणि येत्या आठवड्यात हा अकरावा हफ्ता जमा करण्यात येईल अशी शक्यता आहे.