Maharashtra Schools : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पूर्व प्राथमिक वर्गातील म्हणजेच अंगणवाडी मधील बालकांच्या बाबत आहे. खरंतर काल 19 मे 2025 रोजी शासनाकडून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
हा शासन निर्णय राज्यातील पूर्व प्राथमिक वर्गासाठी म्हणजेच तीन ते सहा वर्ष वयोगटातील अंगणवाडी मधील बालकांसाठी शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मध्ये नवीन अभ्यासक्रम राबवण्याच्या संदर्भात आहे.

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून हा जीआर काढण्यात आला आहे आणि आज आपण याच जीआर च्या संदर्भात सविस्तर डिटेल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्य शासनाचा नवा जीआर काय सांगतो?
राज्य शासनाच्या नव्या जीआर नुसार तीन ते सहा वर्षे वयोगटातील अंगणवाडी मधील बालकांसाठी शैक्षणिक वर्ष 2025 – 26 पासून राबवल्या जाणाऱ्या नव्या अभ्यासक्रमाला आधारशिला बालवाटिका – 01 , आधारशिला बालवाटिका – 02 व आधारशिला बालवाटिका – 03 असे नाव देण्यात आले आहे.
महत्वाची बाब अशी की, बालवाडीतील बालकांसाठी सदर अभ्यासक्रम राबवताना अंगणवाडी सेविकांना पुर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण संबंधी प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना दिले जाणारे हे प्रशिक्षण फक्त पहिल्या वर्षासाठी राहणार नाही तर हे प्रशिक्षण दरवर्षी दिले जाणार आहे.
राज्यातील सर्व अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग सुद्धा केले जाणार आहे. तसेच जर जिल्हा परिषदेच्या शाळेत रिकामी खोली असेल किंवा अतिरिक्त खोली असेल तर अशा ठिकाणी अंगणवाडीचे स्थलांतर करण्याबाबतचा निर्णय सुद्धा आजच्या या शासन निर्णयातून जाहीर करण्यात आला आहे.
दुसरीकडे या शासन निर्णयात नवीन शैक्षणिक धोरण म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची राज्यातील पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाणार याबाबतही स्पष्ट माहिती देण्यात आली आहे.
पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना कसे लागू होणार नवीन शैक्षणिक धोरण?
मिळालेल्या माहितीनुसार 16 जून 2025 पासून सुरु होणाऱ्या येत्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2025-26 या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू केले जाणार आहेत.
यानंतरच्या वर्षात म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या वर्गासाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू होईल. पुढे त्यानंतरच्या वर्षात म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2027 – 28 मध्ये पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीच्या वर्गासाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू केले जाणार आहे.
नंतर मग त्यापुढील वर्षात अर्थातच शैक्षणिक वर्ष 2028-29 मध्ये इयत्ता 8 वी , 10 वी व इ.12 वी वर्गासाठी नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती या काल निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात देण्यात आली आहे.
शासन निर्णय कुठे डाऊनलोड करणार?
महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला 19 मे 2025 रोजी चा शासन निर्णय https://drive.google.com/file/d/14LsekUve9J2fl6LZP3lG_5k50pEuvL5G/view?usp=drivesdk या लिंक वर जाऊन पाहता येणार आहे.