लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार 11वा हफ्ता

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे या योजनेच्या अकराव्या हप्त्याच्या वितरणाबाबत.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ही बातमी लाडकी बहीण योजनेच्या पुढील 11 व्या हप्त्याच्या संदर्भातील आहे. खरंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात आत्तापर्यंत दहा हप्ते जमा करण्यात आले आहे.

या योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता 2 ते 3 मे दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला.

एप्रिलचा हप्ता मे महिन्यात जमा झाला यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी येणार हा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक होते. पण आता याच बाबत मीडिया रिपोर्ट मधून मोठी माहिती समोर येत आहे.

कधी मिळणार मे महिन्याचा हप्ता ?

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या फाईलवर स्वाक्षरी केलेली आहे.

यामुळे येत्या काही दिवसांनी प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे. या योजनेचा अकरावा हप्ता मे महिन्याच्या अखेरपर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

खरेतर मे महिना संपण्यास आता फक्त आठ दिवसांचा काळ बाकी आहे, यामुळे येत्या आठ दिवसात या योजनेचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. 

…तर मे आणि जून दोन्ही महिन्यांचे पैसे सोबत मिळणार

दुसरीकडे, काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये जर मे महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेचा अकरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला नाही तर मे आणि जून या दोन्ही महिन्यांचे पैसे पुढील महिन्यात म्हणजे जून महिन्यात खात्यात जमा केले जातील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जर या महिन्याअखेरपर्यंत पैसे जमा झाले नाहीत तर या योजनेचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो. मे महिन्याचा आता लांबणीवर पडला तर लाडक्या बहि‍णींना पुढच्या महिन्यात दोन्ही हप्त्याचे पैसे मिळू शकतात.

मात्र, लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या माध्यमातून याचा अकरावा हप्ता हा मे महिन्यातच मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा लाभ येत्या आठ दिवसात जमा होणार की आणखी काही काळ वाट पाहावी लागणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News