Snake Viral News : भारतात दरवर्षी हजारो लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात सर्पदंशामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. एका आकडेवारीनुसार देशात जवळपास 90 हजाराच्या आसपास लोक दरवर्षी सर्पदंशाने मरण पावतात.
खरे तर भारतात सापांच्या शेकडो प्रजाती आढळतात. मात्र यातील बहुतांशी प्रजाती बिनविषारी आहेत. देशात बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती विषारी असल्याचे बोलले जाते.

मात्र तरीही देशात सर्पदंशाने मरण पावणाऱ्यांची संख्या उल्लेखनीय असून यामुळे साप दिसला तरी देखील अंगावर काटा उभा राहतो. दरम्यान आज आपण जगातील सर्वाधिक विषारी सापांच्या जातीची माहिती पाहणार आहोत.
विशेष बाब अशी की जगातील सर्वाधिक विषारी सापांच्या यादीत भारतातील दोन-तीन सापांचा समावेश होतो. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया जगातील सर्वाधिक विषारी साप कोणते आहेत आणि ते कोणत्या देशात आढळतात.
हे आहेत जगातील सर्वाधिक विषारी साप
कोस्टल ताइपन : याला कॉमन ताइपन या नावाने सुद्धा ओळखले जाते. साप जगातील सर्वाधिक विषारी सापांच्या यादीत येतो आणि या जातीच्या सापाचे विष फारच प्राणघातक आहे.
ईनलँड ताइपन : हा साप देखील ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो आणि जगातील सर्वाधिक विषारी सापांच्या यादीत याचाही समावेश होतो. या जातीच्या सापाचे विष सुद्धा फारच प्राण घातक असते.
बँडेड क्रेट : हा भारतीय उपखंडात आढळणारा साप फारच प्राणघातक आहे. हा जगातील सर्वाधिक विषारी सापांच्या यादीत येतो. भारतातील अनेक राज्यांमध्ये या जातीच्या सापाचा वावर आढळतो. भारतीय उपखंड, आग्नेय आशिया आणि चीनच्या दक्षिणेकडील भागांमध्ये हा साप मोठ्या प्रमाणात आढळून येतो.
ईस्टर्न टायगर स्नेक : हा देखील जगातील सर्वाधिक विषारी साप म्हणून ओळखला जातो. या सापामध्ये जगातील सर्वाधिक प्राणघातक विष आढळते. हा साप चावल्यानंतर पंधरा मिनिटातच विषबाधा होते. हा साप चावला तर काही मिनिटातच मरण येऊ शकते.
रसेल वाईपर : भारतात सापाच्या फारच मोजक्या जाती विषारी आहेत आणि याच विषारी जातीपैकी एक म्हणजेच रसेल वायपर. हा साप भारतीय उपखंडात आढळतो आणि या जातीचे विष देखील फारच जहाल आहे. ही जात भारतातील चार सर्वात मोठ्या जातींपैकी एक आहे.
फेर डी लान्स : हा साप अमेरिकेत आढळतो. अमेरिकेच्या दक्षिणेकडील भागांमध्ये या सापाचा वावर दिसतो. दक्षिण अमेरिकेतील सर्वाधिक प्राणघातक सापांच्या यादीत यालाही ठेवले जाते. या सापाच्या चाव्याने मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते.
किंग कोब्रा : किंग कोब्रा हा जगातील सर्वाधिक विषारी सापांच्या यादीत येतो आणि याचा वावर आपल्या भारतात सुद्धा आहे. भारतातील सर्वाधिक विषारी सापांपैकी एक असणारी ही जात भारतीय उपखंडात मोठ्या प्रमाणात आढळते. ही जात आपल्या महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसते.