Indian Railway Facts : भारतातील सर्वात लांब नावाचं रेल्वे स्थानक ! ऐकून विश्वास बसणार नाही

भारतातील सर्वात लांब नावे असलेल्या रेल्वे स्थानकांच्या यादीत हे स्थानक अव्वल स्थानकावर आहे. परंतु तेथील स्थानिक लोक हे नाव अगदी बरोब्बर उच्चारतात.

Published on -

Indian Railway Facts : भारतीय रेल्वेला मोठा इतिहास आहे. भारतीय रेल्वे ही आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वेचे देशभरात सुमारे आठ हजारांपेक्षा जास्त रेल्वे स्थानके आहेत. रेल्वे स्थानकांचा आणि त्यांच्या नावाचाही मोठा इतिहास आहे. काही नावे अत्यंत रोचक व मनोरंजकही आहेत. त्यांच्या कहाण्याही वेगवेगळ्या आहेत. रेल्वे स्थानकां नावाच्या यादीत असे एक नाव आहे, जे सर्वात मोठे आहे. होय, भारतातील एका रेल्वे स्थानकाचे नाव तब्बल २८ अक्षरांचे आहे.

स्थानकांच्या नावाचा इतिहास

भारतातील अनेक रेल्वे स्थानके ही वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नावांसाठी, इतिहासासाठी आणि वेगवेगळ्या कथांसाठी काही रेल्वे स्थानके ओळखली जातात. काही रेल्वेस्थानकांची नावे ही विनोदी आहेत तर काही नावे एवढी अवघड आहेत, की ती एकदा वाचल्यावर लक्षात राहत नाहीत. भारतात सुमारे आठ हजारांहून अधिक रेल्वे स्थानके आहेत.

सर्वात मोठे नाव कोणते?

भारतातील सर्वात अवघड व सर्वात मोठे नाव, कोणत्या रेल्वे स्थानकाला आहे? तर ते आंध्रप्रदेशातील एका रेल्वे स्थानकाला आहे. आंध्रप्रदेशातील एका एका रेल्वे स्थानकाचे नाव एवढे अवघड आहे, की ते एकदा वाचल्यावर लक्षात राहत नाही. ते इंग्रजीतून वाचा किंवा थेट तुमच्या मातृभाषेतून ते पटकन लक्षात राहत नाही. हे नाव तब्बल 28 अक्षरांचे आहे. ते नाव आहे, वेंकटनरसिंहराजुवरीपेटा. हे भारतातील सर्वात मोठे नाव असलेले रेल्वे स्टेशन आहे.

कोठे आहे हे स्थानक?

हे अनोखे रेल्वे स्थानक आंध्र प्रदेश राज्यात आहे. याला थोडक्यात विरापा (वेंकट नरसिंह राजुवरी पेटा) असेही म्हणतात. हे स्टेशन रेनिगुंटा – अरक्कोनम रेल्वे मार्गावर येते. या रेल्वे स्टेशनला एका प्राचीन राजाचे नाव देण्यात आले आहे. स्टेशनच्या नावात समाविष्ट असलेल्या प्रत्येक शब्दाचे स्वतःचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. हे नाव तेलुगू भाषेत आहे.

काय आहे नावाची कथा?

आंध्र प्रदेशाचे प्रसिद्ध राजा श्री वेंकट नरसिंह राजू यांच्या सन्मानार्थ या स्थानकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या कारकिर्दीत या प्रदेशात आर्थिक आणि सांस्कृतिक विकास झाला. त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी स्टेशनला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe