Nashik News : नाशिक हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय जिल्हा. कुंभ नगरी म्हणूनही नाशिक शहराला ओळखले जाते. द्राक्षांचा जिल्हा तसेच वाईन सिटी म्हणून नाशिकला ओळख मिळालेली आहे. नाशिक जिल्ह्याला फारच धार्मिक महत्त्व आहे. रामायणात सुद्धा नाशिक जिल्ह्याचा उल्लेख आढळतो.
इथं बारा वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन होते. यामुळे श्रीक्षेत्र नाशिक धार्मिक पर्यटनासाठी विशेष लोकप्रिय आहेत. याशिवाय नाशिक मध्ये औद्योगिक वसाहती देखील आहेत आणि या औद्योगिक वसाहतींमध्ये अनेक नामांकित उद्योग आपल्याला पाहायला मिळतात.

यामुळेच नाशिक शहरात अनेक श्रीमंत लोकांचा वावर असतो. नाशिकमध्ये अनेक श्रीमंत लोक वास्तव्याला आहे. दरम्यान आज आपण नाशिक शहरातील अशा पाच ठिकाणांची माहिती जाणून घेणार आहोत जिथे शहरातील धनाड्य लोक राहतात.
आज आपण शहरातील पाच सर्वाधिक श्रीमंत एरियाची माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी शहरातील अनेक श्रीमंत व्यापारी राजकारणी आणि शेतकरी लोकांचा निवास असल्याचे सांगितले जाते.
हे आहेत नाशिक शहरातील टॉप 5 श्रीमंत एरिया
महात्मा नगर : महात्मा नगर हे नाशिक शहरातील सर्वाधिक पॉश ठिकाण आहे. या ठिकाणी शहरातील अनेक श्रीमंत लोक वास्तव्याला आहेत. हा शहरातील सर्वाधिक उच्चभ्रू परिसर असल्याचे बोलले जाते. नाशिक विमानतळापासून हे ठिकाण फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे आणि नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
गोविंद नगर : गोविंद नगर हा देखील नाशिक शहरातील सर्वाधिक उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसराला नाशिक फ्रीवे, राष्ट्रीय महामार्ग 50 आणि मुंबई आग्रा रोडची कनेक्टिव्हिटी लाभलेली आहे. हे ठिकाण नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणापासून अगदीच हाकेच्या अंतरावर आहे.
नासिक विमानतळ यातून फक्त 22 किलोमीटर अंतरावर आहे आणि नाशिक रोड रेल्वे स्थानक येथून फक्त नऊ किलोमीटर अंतरावर आहे. यामुळे येथे शहरातील अनेक श्रीमंत लोक वास्तव्याला असल्याचे सांगितले जाते.
पाथर्डी फाटा : पाथर्डी फाटा परिसर फारच पॉश आहे. इथेही शहरातील अनेक उच्चभ्रू व्यापारी राजकारणी आणि श्रीमंत शेतकरी लोक राहतात असे म्हटले जाते. पाथर्डी फाटा परिसर नाशिक मधील झपाट्याने विकसित होणारा परिसर आहे. नाशिक विमानतळ आणि नाशिक रोड रेल्वे स्थानक या ठिकाणाहून अगदीच हाकेच्या अंतरावर आहे.
इंदिरानगर : हा परिसर सुद्धा वाईन सिटी म्हणून ख्यातनाम असणाऱ्या नाशिक मधील एक पॉश एरिया आहे. या ठिकाणी सुद्धा अनेक श्रीमंत लोक राहतात. नाशिक शहराच्या पश्चिमेकडे असणारे हे ठिकाण वास्तव्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे.
गंगापूर रोड : गंगापूर रोड परिसरात देखील नाशिक शहरातील अनेक श्रीमंत लोक राहतात. हा शहरातील एक वेल डेव्हलप परिसर आहे. या ठिकाणी वास्तव्याला असणाऱ्या रहिवाशांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत.