7th Pay Commission DA Hike : सध्या महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून येत्या काही दिवसांनी आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
एक जानेवारी 2026 पासून नव्या आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती समोर येत आहे. नवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर देशभरातील जवळपास एक कोटी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना फायदा होणार आहे.

दरम्यान नवीन वेतन आयोग लागू होण्याआधीच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 55% DA
राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर वाढवला जाणार आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात सुधारित करण्यात आला.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 53 टक्क्यांवरून 55 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू आहे. दरम्यान आता राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा 53% वरून 55% इतका होणार आहे.
म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांचा डीए दोन टक्क्यांनी वाढणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू राहणार असून याबाबतचा निर्णय येत्या काही दिवसांनी होण्याची दाट शक्यता आहे.
जसे की आपणास ठाऊकच आहे की नुकत्याच काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित करण्यात आला. अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्राच्या धर्तीवर 55% इतका झाला आहे.
असं सांगितलं जातं की जेव्हा अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता वाढतो त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांचा सुद्धा महागाई भत्ता वाढवला जातो.
यानुसार फडणवीस सरकार पुढील जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला की त्यानंतर याचा शासन निर्णय जाहीर होणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 58% होणार!
एकीकडे महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा डीए पुढील महिन्यात पंचावन्न टक्के होईल अशी माहिती समोर आली आहे तर दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक महागाई भत्ता वाढ मिळणार आहे.
खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून अशी वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ मिळते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढत लागू झाली आहे आता जुलै महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ लागू होणार असून याचा प्रत्यक्षात निर्णय हा दिवाळीच्या सुमारास घेतला जाईल.
म्हणजे दिवाळीच्या सुमारास याबाबतचा शासन निर्णय निघणार आहे. तथापि त्यावेळी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार महागाई भत्ता वाढ जुलै 2025 पासूनच लागू राहील. दरम्यान जुलै महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असल्याची बातमी मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे जुलै महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला जाणार असल्याचे बोलले जात आहे. खरेतर, जानेवारी ते जून 2025 या कालावधीमधील केंद्र सरकारच्या कामगार विभाग मार्फत जाहीर केल्या जाणाऱ्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार हे ठरवणार आहे.
आतापर्यंत जानेवारी ते मार्च या कालावधी मधील निर्देशांक समोर आले आहेत लवकरच एप्रिल, मे आणि जून या महिन्यांचे निर्देशांक सुद्धा जाहीर केले जातील. त्यानंतर मग प्रत्यक्षात महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार की चार टक्क्यांनी की मग दोन टक्क्यांनी हे क्लिअर होणार आहे.