पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! मेट्रो प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

तुम्हीही पुणे मेट्रोने प्रवास करता का? अहो मग तुमच्यासाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. पुणे मेट्रो प्रशासनाच्या माध्यमातून प्रवाशांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे.

Published on -

Pune Metro : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळ देण्यासाठी मेट्रो सुरु करण्यात आली आहे. आगामी काळात ठाणे आणि नाशिक सारख्या शहरातही आपल्याला मेट्रो धावताना दिसणार आहे.

महत्वाची बाब म्हणजे ठाण्यातील मेट्रो प्रकल्पाचे काम येत्या काही दिवसांनी पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबई मेट्रोचा विस्तार थेट बदलापूर पर्यंत होणार आहे. अशातच आता पुणेकरांसाठी मेट्रोच्या संदर्भात एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे पुणे मेट्रो प्रशासनाकडून प्रवाशांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या या नव्या योजनेमुळे पुणेकरांना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.

काय आहे नवीन योजना? 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रोकडून प्रवाशांच्या सोयीसाठी ‘वन डे ट्रॅव्हल पास’ योजना सुरू करण्यात आली आहे. या नव्या योजनेमुळे पुणे मेट्रो ने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

कारण की या योजनेतून केवळ 100 रुपयांमध्ये प्रवासी दिवसभर मेट्रोने अमर्यादित प्रवास करू शकतील. म्हणजेच वन डे ट्रॅव्हल पास काढला की पुणेकरांना एक दिवसभर प्रवास करता येणार आहे. ही योजना विशेषतः विद्यार्थी, कामगार, नोकरदार आणि पर्यटकांसाठी उपयुक्त ठरणार अशी माहिती जाणकारांकडून दिली जात आहे.

पुण्यात 2 मेट्रो मार्ग सुरु आहेत 

आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, सध्या पुणे शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी सध्या पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी हे दोन मेट्रो मार्ग सुरू करण्यात आले आहेत.

येत्या काही दिवसांनी या मेट्रो मार्गांचा विस्तार सुद्धा होणार आहे. याव्यतिरिक्त पीपीपी तत्त्वावर सुद्धा एक मेट्रो मार्ग डेव्हलप केला जात आहे. हा पीपीपी तत्त्वावर डेव्हलप होणारा मेट्रो मार्ग शहराच्या मध्यवर्ती भागातून म्हणजेच शिवाजीनगर मधून सुरू होणार आहे आणि थेट आयटी हब म्हणून ख्यातनाम असणाऱ्या हिंजवडी पर्यंत राहील.

त्यामुळे नक्कीच पुण्यातील मेट्रोचे जाळे आणखी विस्तारले जाणार यात शंकाच नाही. दरम्यान आता पुणे मेट्रो ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वन डे ट्रॅव्हल पास योजना सुरू झाली आहे.

या अंतर्गत वनाझ–गरवारे कॉलेज आणि पिंपरी–स्वारगेट या दोन्ही मार्गांवर एकाच पासवर कुठेही, कितीही वेळा प्रवास करता येणार आहे. यामुळे वेळ आणि पैशांची मोठी बचत होणार असून, मेट्रोचा वापर वाढण्यास मदत होणार असा विश्वास प्रशासनाकडून यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

जर तुम्हीही पुणे मेट्रोने प्रवास करत असाल तर तुम्हाला हा पास मेट्रो स्टेशनवरील टोकन काउंटरवर तसेच मेट्रो अ‍ॅपवरही उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे नागरिक सार्वजनिक वाहतुकीकडे वळतील एवढे नक्कीच.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News